कविताचंद्रपूरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
मी आणि माझी लेखणी; दिनकर झाडे
0
4
8
2
8
6
मी आणि माझी लेखणी
विषय असो कोणताही
वा असो कोणती वेळ
आलीच वेळ निर्णयाची
तर घालतो त्यात मेळ
न करता कठोर वर्तन
जाणतो त्यामागील सत्य
उचित अनुचित बघुनी
निःपक्षपाती पाळतो पत्थ्य
व्यथा वेदना समाजातील
उतरविते ती कागदपानी
अंतःकरणाला साद घालते
सत्य विदारक तिची वाणी
अनिष्ट रूढी परंपरांना
अलवार घालते ती हात
अन्यायाला वाचा फोडण्या
करतो लेखणीतून मात
करुनी विचार सारासार
लावी विवेकबुद्धी पणाला
योग्य न्याय सिद्ध होता
लागू न देई धक्का तनाला
परोपकाराची मिळता संधी
करी सत्कार्याची आखणी
करता व्यक्त भाव मनातील
प्रकटे,..मी आणि माझी लेखणी
प्रा दिनकर झाडे, गडचांदूर
जि. चंद्रपूर
==========
0
4
8
2
8
6



