0
4
8
2
9
7
सुनिता सुरेश भगत यांचे दुःखद निधन
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: आवास गावातील एक प्रेमळ व्यक्तीमत्व सुनिता सुरेश भगत यांचे बुधवार दि. ४ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी आवास [ भगत आळी ] येथे रहात्या घरी वयाच्या ७३ व्या वर्षी आजारपणामुळे दुःखद निधन झाले. गुरूवार दि. ५ जून २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता आवास [ भगत आळी ] येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि. १३ जून २०२५ रोजी आवास [ भगत आळी ] येथे सकाळी ८.०० वाजता होणार आहे.
सुनिता सुरेश भगत अतिशय मायाळू, प्रेमळ, सुस्वभावी व कष्टाळू होत्या. त्यांच्या निधनाने आवास गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या आत्म्यास चिरःशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
0
4
8
2
9
7

