0
4
8
2
9
3
जन्माष्टमी
जय देव जय देव जय कृष्णमुरारी
पाळण्यात सजवलेली मूर्ती प्यारी…!!धृ!!
सडा रांगोळीने अंगण दिसे भारी
पानाफुलांचे तोरण शोभे दारावरी
जन्माष्टमी उपवास भक्तीभाव ऊरी
जय देव जय देव जय कृष्णमुरारी..!!
रंगीबेरंगी प्रकाश माळा घरावरी
भजन कीर्तनात रंगलेली नरनारी
कृष्णरूप बालके मोरमुकुटधारी
जय देव जय देव जय कृष्णमुरारी..!!
मातीची अवीट गोडी जिभेवरी
गोपालांना जमवून दहीदुधचोरी
बासरीच्या नादात गुंग राधा गोरी
जय देव जय देव जय कृष्णमुरारी..!!
पदस्पर्शाने धन्य गोकुळ नगरी
बंदिवासमुक्ती सोळासहस्त्र नारी
विनाशस्त्रधारी लीला चित्त थरारी
जय देव जय देव जय कृष्णमुरारी..!!
जन्माष्टमी उत्सव आज देशभरी
दहीहंडी काला प्रसाद गोड भारी
सुख शांती प्रीतसंदेश वसे अंतरी
जय देव जय देव जय कृष्णमुरारी..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
4
8
2
9
3



