Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

निखारा

आशा कोवे गेडाम वणी जि.यवतमाळ

0 4 8 3 0 0

निखारा

तप्त काळजात त्याच्या परिस्थितीचा लाव्हा
आगीच्या ज्वाळेमध्ये विरला बालमनाचा ठेवा

मन झाले लोखंड झेलते संघर्षाचे घाव
पोटासाठी झिजतो करतो जिंदगीचा भाव

धरेचीच कुश त्याला आभाळाचे छत्र
लोखंडी जंत्रीसवे जीवन सारे गलितगात्र

वाऱ्याच्या झोताने फडफडते निवारपाल
उघड्यावरच्या कुटुंबात धैर्य मनाची ढाल

कोवळीक कोमेजली गळती घामाच्या धारा
डोळ्यात अधुरे स्वप्न जळतो वेदनेचा निखारा

भटकंतीतच आयुष्य सारे हरवली शिक्षणाची वाट
बदलाचा तू कर निर्धार गवसेल तुजला नवी पहाट

सोडून सारी हतबलता पिऊन घे ध्येयाचा वारा
आव्हानांशी झुंज दे घेऊन हातात निखारा

आशा कोवे गेडाम
वणी जि.यवतमाळ
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे