
0
4
0
8
8
7
विदूषक
चिंटू, पिंटू,मिंटू,चिंगी
सर्कस बघायला गेले
बुडवली त्यांनी शाळा
आईला नाही सांगितले
सर्कसीतला विदूषक बघून
मुले खूप खूप हसली
भला मोठा हत्ती बघताच
सारी पोरं नाचायला लागली
विदूषकानी केलेला रोल
आवडला मुलांना फार फार
काही वेळाने माणसे आली
बलाढ्य हत्तीवर होऊन स्वार
त्यांच्यातील कला कौशल्याने
मग काय सर्कसीला आला रंग
दिवस मावळला कळेना त्यांना
मुले सर्कस पाहण्यातच दंग
आईने इकडे तिकडे शोधले
बाईंना मुलांबद्दल विचारले
मुले घरी हळूच येऊन लपली
गृहपाठ पुर्ण करा आईने शिक्षा दिली
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
========
0
4
0
8
8
7





