ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रसाहित्यगंध
सत्त्वपरीक्षा
पांडुरंग एकनाथ घोलप ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
9
0
सत्त्वपरीक्षा
लेखणीची आज माझ्या
झाली खरी सत्त्वपरीक्षा
स्वीकारले असिधारा व्रत
मिळाली अवचित दीक्षा
लेखणी हाती आली
सत्य वदाया कारण
भावना ठेवल्या काबूत
काळीज ठेवले तारण
सत्य परखड लिहावे
असे मनात मी म्हणतो
निर्भीड लेखणीला या
असत्याचा काटा सलतो
वास्तवाचे भान ठेवून
कागद हातात आला
सात्विक विचारांचा तेव्हा
लेखणीचा घाव झाला
सदाचाराची ही कसोटी
निरपेक्ष होते सारे भाव
लेखणीने घेतला माझ्या
वाचकांच्या काळजाचा ठाव
सत्त्वपरीक्षा खरीच झाली
लेखणीची किमया न्यारी
सत्याचा पडला प्रभाव
नाहीच असत्याची कैवारी
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
9
0



