Breaking
ई-पेपरकविताचंद्रपूरविदर्भसाहित्यगंध

भूस्खलन

प्रा.दिनकर झाडे गडचांदूर, जि चंद्रपूर

0 4 8 2 9 7

भूस्खलन

दुभंगली धरणीमाता
आकाशही फुटले रे
भूस्खलन होता राती
नाते गोते तुटले रे. //१//

कल्पनाही नव्हती मनी
भूस्खलन होणार हे
असता साखर झोपेत
जीवनही संपेल हे //२//

डोंगराच्या पायथ्याशी
इशाळगड हे गाव
भूस्खलनाच्या काळोखात
लुप्त झाले तेही नाव //३//

झाली होळी संसाराची
उघड रे देवा दार !
निसर्गाच्या पुढें माझी
कशी चालेल मदार ? //४//

निसर्गाचे कालचक्र
कसे उलटे फिरले
झाले उध्वस्त संसार
नि अस्तित्वही ना उरले//५//

प्रा.दिनकर झाडे
गडचांदूर, जि चंद्रपूर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे