Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकिय

गुढीपाडव्याच्या शुभदिनी गौळी समाजाच्या सभागृहाचे लोकार्पण

(लेखक - बळवंत वालेकर ज्येष्ठ पत्रकार )

0 5 1 6 4 1

गुढीपाडव्याच्या शुभदिनी गौळी समाजाच्या सभागृहाचे लोकार्पण

(लेखक – बळवंत वालेकर ज्येष्ठ पत्रकार )

यादव चौली गौळी समाज ही नोंदणीक्रुत संस्था असून या संस्थेच्या पदाधिका-यांनी समाज बंधूंकडून पै – पेसा गोळा करून आलिबाग – वशडखळ राष्ट्रीय महामार्गावर *खडाळे* येथे सुमारे ४ कोटी रुपये मूल्याचे सुसज्ज सभाग्रुह बांधले आहे. सदर सभाग्रुहाचा लोका र्पण सोहळा *गुढीपाडव्या* च्या शुभदिनी

(दि. १९ मार्च रोजी ) रायगडचे खासदार *सुनिलजी तटकरे* साहेब* यांच्या हस्ते आयोजिले आहे . त्यानिमित्त थोडेसे.
*विविधतेतून* एकता हे भारत देशाच्या एकात्मतेचे सूत्र आहे . कारण आपला देश अनेक जाती , धर्म , पंथ , भाषा , प्रांत व विभिन्न भौगोलिक रचनेने बनला आहे . म्हणून महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकास *मात्रुभाषा मराठी* सह *महाराष्ट्राचा अभिमान आहे . गुजराती माणसास मात्रुभाषा गुजरातीसह गुजरात प्रांताचा अभिमान असणे स्वाभाविक आहे . कन्नड , तेळगू , मल्याळी, उडिया, पंजाबी भाषिकांना प्रथमतः त्या त्या प्रांताचा नंतर मायभूमी – *भारतमाते*- चा अभिमान असतो. विविध धर्म व जाती – पातीबाबतही हेच सूत्र आहे . अगणित जाती , उपजातींमध्ये एकोपा झाल्यास त्यांची वैचारिक , सामाजिक , आर्थिक व शैक्षणिक प्रगती होते . जुन्या रुढी – परंपरा , अंधश्रद्धा , महिलाँना *अबला**समजण्याची प्रव्रुत्ती तसेच दबावाखाली काम करण्याची व्रुत्ती नष्ट होते . त्यामुळे *लोकशाही* द्रुढ होते . आपापसातील वैमनस्य दूर जातात . याचे अनुकरण अन्य जाती करतात. परिणामे जाती -उपजातीँमध्ये सलोखा निर्माण झाल्यामुळे राज्याची प्रगती होते परिणामतः
*देश प्रगातीपथावर** जातो , हाच आदर्श समोर ठेवून *बाबूराव घोसाळकर* व अन्य धुरिणांनी सावरोली (ता. खालापूर) येथे १९५८ साली यादव चौली गवळी समाजाच्या संघटनेची *गुढी* बांधली . ३ – ४ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या छोटेखानी समाजाने ज्ञातीबंधूंच्या पापठबळामुळे उभारी घेतली . युवकाँचे सहकार्य लाभले . समाजातील अन्य गावैही संघटनेत सामील झाली . संघटनैला आर्थिक शिस्त लागण्यासाठी संघटनेची सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी ( registration ) केली गेली . संघटनेला स्थैर्य येण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी *समाजभवन* बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या, समाजबंधूंकडून देणग्या गोळा करून
*पेण या मध्यवर्ती ठिकाणी समाजभवन* बांधले गेले.
पण त्यातील त्रुटीँचा विचार करून ती वास्तु विकून *अलिबाग* या जिल्हा मुख्यालयाजवळ *नूतन समाजभवन* उभारले गेले . या
*सभाग्रुहा* चा लोकार्पण सोहळा
*गुढीपाडव्या* च्या शुभ मुहूर्तावर
*खासदार सुनिलजी तटकरे* यांच्या ह स्ते हौत आहे .
*डोंगर -कपारीत स्थिरावलेला समाज*
भगवान श्री क्रुष्णाचा वंशज असलेला यादव गौळी समाज डोंगर -कपारीत स्थिरावून गाई – म्हशी पाळून व दूध विकून उपजीविका करणारा भटक्या स्वरुपाचा आहे . जेथे चराऊ कुरणे आहेत तेथे या . .समाजानै राहुट्या केल्या.. .उदर निर्वाहासाठी सतत भटकँती. म्हणून आर्थिक , सामाजिक व शैक्षणिक द्रुष्ट्या मागासलेल्या व सतत भटकंती करणाऱ्या ,समाजाची जलद गतीने शैक्षणिक , सामाजिक व आर्थिक प्रगती होण्यासाठी केंद्र शासनाने *भटक्या – विमुक्त जमातीचा दर्जा देण्यासाठी भारतभर चळवळी झाल्या,, संसद भवन तसेच राज्य विधी मंडळावर मोर्चे निघाले.निवैदने दिली . अशा चळवळी सतत केल्यामुळे नामदार *अटल बिहारी वाजपेयी* पंतप्रधान असताना या जातीचा
*भटक्या – विमुक्त जमातीत* समावैश केला गेला. महाराष्ट्रात या जातीच्या अनेक पोटजाती आहेत . त्यात चौली गवळी वा दाभोळी गौळी या दोन उपजातीआहैत, पैकी चौली – गौळी ही उपजात *अत्यल्पसंख्य* आहे . ती रायगड , ठाणे , मुंबई व सोलापूर जिल्ह्यात विस्तारली आहे , गायी – म्हशी पाळणे व जवळच्या शसरात दूध विकून उपजीविका करणे हा नित्यक्रम. हा समाज रायगड (कुलाबा) जिल्ह्यातील काही तालुके व ठाणे जिल्ह्यातील कांबे (ता. भिवंडी) येथे स्थिरावला. . नंतर काही बांधव नौकरी , व्यवसायानिमित्त मुंबई , कल्याण व सोलापूर येथे राहू लागले. अनेक वाड्यांमध्ये , आडवळणी असलेल्या छोट्या छोटया गावांमध्ये राहणाऱ्या ज्ञातीबंधूंना एकत्रित करून त्यांची शैक्षणिक व सामाजिक आणि आर्थिक प्रगती होण्यासाठी
*सावरौली* (ता. खालापूर) ग्राम पँचायतीचे तत्कालीन सरपंच *बाबूराव घोसाळकर* यांनी व त्यांच्या सहका-यांनी काही गावांना भेटी देऊन समाज संघटनैबाबत वातावरण निर्मिती केली . . आणि गावोगावी पत्रव्यवहार करून औपचारिक बैठक १९५८ सालातील जुलै महिन्यात सावरोली येथे आयोजिली. सदर बैठकीस शँकरराव कोठे ( सरपंच का़बे जि. ठाणे) महादेव पिठू काटले (सरपंच बेलोशी – अलिबाग) आत्माराम विठ्ठल वालेकर (सरपंच वाघोली – अलिबाग) , गो. रा. काटले गुरुजी बेलोशी) ग. रा. पाडगे , गुरुजी ( बेलोशी) द. रा. वालेकर गुरुजी (वाघोली) , देवराम लक्ष्मण वालेकर (वाघोली) , आर्. के. वरणकर रोहे) , नारायण विठैबा चौलकर (नागोठणे) , बयाजी वगरे
( आपटा) शँकर मेहेतर ( आपटा) सटुराम चोगले , श्रीमती, अनुसया घोसाळकर, , गौतम घोसाळकर
(सावरोली) , बाबूराव दाँडेकर
(मास्तर -महाळुंगे) दगडू म्हैतर (
(खरौशी) इ. ज्ञातीबंधू शउपस्थित होते . ( ही (यादी अपूर्ण आहे .) या बैठकीत संघटनेबाबत अनेकांनी आपले विचार माँडले. त्यात *श्रीमती अनुसया रामचंद्र घोसाळकर* या महिलेचाही समावेश होता . याच बैठकीत समाज मंडळाच्या अध्यक्षपदी
*बाबूराव घोसाळकर*(सावरोली) सेक्रेटरीपदी *शंकरराव कोठे* (कांबे) खजिनदारपदी व *गो. रा. काटले* गुरुजी (बेलोशी) यांची निवड होऊन कामकाज चालू झाले .समाज मंडळाच्या स्थापना काळात सावरोली , कांबे , बेलोशी , वाघोली , आपटे , नागोठणे , रोहै ही गावे अग्रेसर होती .कार्यकारी मंडळाच्या बैठका ३ – ४ महिन्यांनी आळीपाळीने गावोगावी होऊ लागल्या.दरवर्षी आळीपाळीने वार्षिक सभाही हौत असत. त्याकाळात दरवर्षी कार्यकारी मंडळ बदलत असे, आळीपाळीने प्रत्येक गावाला अध्यक्षपदाचा बहुमान दिला जात असे, असे असले तरी खजिनदारपदी *गो, रा. काटले* गुरूजी यांना अनेक वर्षे कायम निवडले होते .
वार्षिक वर्गणीतून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देत असत. कार्याकारिणी च्या सभा तसैच वार्षिक सभाही होत पररंतु दाळणवळणाची साधने नव्हती . धरामतरखाडीवर पूल नव्हता , रेवदंडा खाडीवर साळावला जोड णारा पूलही नव्हता म्हणून कारभारात गती येत नव्हती .
*समाजाचे दोन भाग* .
सह्य पर्वतात उगम पावणारी *कुंडलिका* नदी भिरा , कोलाड , रोहामार्गे येऊन रेवदंडा खाडीस मिळते . *खाडीच्या अलिकडे* (उत्तर बाजूस) ) बेलोशी , वाघोली , सावरोली , आपटे , नागोठणे सागरगड – माची , खरोशी व कांबे (जि, ठाणे) तसेच मुंबई व कल्याण या गावांचा समावेश होतो तर *खाडीच्या पलिकडे* ( दक्षिण बाजूस) )
महाळुंगे , काकळघर , वांदेली , शिरगाव , मुरुड (ता. मुरुड) तारणे , बामणघर, , महागाव , साखरेचीवाडी, इंदापूर (ता. माणगाव आणि तळा) अशी गावे आहेत . रेवदंडा खाडीपलिकडे (दक्षिणेकडे ) असलैल्या गावाँच्या वेगाळ्या बैठका होत तसेच त्यांचा शिक्षण फंडही वैगळा होता . पूर्वी रोटी -बेटी व्यवहार देखील होत नसत. खाडीअलिकडील गावे ( उत्तरेकडील) ) दोन बुके अधिक शिकलेली ( सुधारलेली ) होती . परंतु खाडीच्या पलिकडील गावे कमी शिकलैली आसली तरी विश्वासार्हता होती , शब्दाला पक्की होती . या मतभेदामुळे दोन पट्ट्यांमध्ये वैचारिक दरी निर्माण झाली .ही दरी नष्ट करण्याचे काम तत्कालीन तलाठी व समाजाचे माजी अध्यक्ष नारायण विठोबा चौलकर (रा. नागोठणे ) व समाजातील पहिले मँट्रिक्युलेट आणि S T, महामंडळाचे अधिकारी आर्, के. वरणकर (रा. रोहे – गौळीवाडी ) यांनी केले. म्हणून समाज मंडळास उभारी आली. त्याकाळात समाजाचे अध्यक्षपद वयस्क व सुजाण व्यक्तीस दिले जात असे. हा कालावधी वर्षाचा आसे.
जनसंपर्क वाढल्यामुळे व खाडी अलिकडील व पलिकडील असे दोनही भाग एकत्रित आल्यामुळे वार्षिक सभेस गर्दी होऊ लागली . . अशा समाज मंडळाचे *प्रथम* अध्यक्षपद *बाबूराव घोसाळकर* यांनी भूषविले. त्यानंतर शँकरराव कोठे , सटुराम चोगले , महादेव पिठू काटले , दैवराम लक्ष्मण वालेकर , जनार्दन रामचंद्र वालेकर , बयाजी वगरे , बाबूराव दांडेकर (मास्तर) आत्माराम भिकू मिनमिनै , दगडू म्हेतर , गणपत अंतू म्हेतर , इ. नी भूषविले.
*युवकाँनी सूत्रे हाती घेतली*
१९५८ साली स्थापन झालैल्या समाज मंडळाचा कारभार चालू होता . वार्षिक सभा होत असत. गजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत चालू होती . पण युवक नाराज होते . कारभार गतिमान होण्यासाठी , मध्यवर्ती ठिकाणी समाजाची वास्तु उभारणे , समाज मंडळास आर्थिक शिस्त लागण्यासाठी संघटना नोंदणीक्रुत करणे याकरिता कांबे (जिल्हा ठाणे) येथी ल युवक सुरेश पालकर व मनोहर पायकर पुढे सरसावले. *१९८८साली* महाळुंगे (ता . मुरुड) येथे झालेल्या वार्षिक सभेची सूत्रै त्यांनी हाती घेतली . आणि युवकां चे कार्यकारी मंडळ निवडून आणले,
*सुरैश पालकर* अध्यक्ष व *मनोहर पायकर* सेक्रेटरी झाले. कार्यकारी मंडळात सर्व युवक होते पण पूर्वीचे खजिनदार *गो. रा. गुरुजी* यांना चोख कारभारामुळे त्याच
पदावर कायम ठेवले गेले. गतिमान कारभाराची पुढील दिशा ठरविण्यासाठी आपटे (ता. पनवेल) येथील युवक *भगवान पाडगे* व *सुदाम म्हेतर* यांच्या आग्रहामुळे तातडीने आपटे येथे युवक मेळावा आयोजिला. या मेळाव्यास युवकांसह व्रुद्धही उपस्थित होते. त्यामुळे नूतन अध्यक्ष *सुरेश पालकर* व सेक्रेटरी *मनौहर पायकर* यांचा उत्साह द्विगुणित झाला. आणि समर्थपणे गतिशील काम करण्यासाठी कार्यकारिणीचा कालावधी ५ वर्षे केला . गेला. *पेण* या मध्यवर्ती ठिकाणी समाजाची वास्तु उभारणे तसेच आर्थिक शिस्तीसाठी समाजमंडळ नोंदणीक्रुत करण्यासाठी अपार कष्ट घेतले. आणि समाजाची वास्तु बांधण्यासाठी नियोजनपूर्ण ला़ँटरी काढली व निधी जमविला . त्यामुळे *पेण* येथे समाजाची वास्तु उभारली गेली . तसेच आर्थिक शिस्तीसाठी समजमंडळ नोंदणीक्रुत केले गेले. युवकाँंचा सहभाग अधिक वाढण्यासाठी *क्रिकेट स्पर्धा चालू केल्या. झटपट कामाच्या गतीमुळे नूतन अध्यक्ष सुरेश पालकर व सेक्रेटरी मनोहर पायकर यांचे सर्वत्र अभिनंदन होऊ लागले
*शिक्षण समिती कार्यरत*
समाजातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर सुधारावा , व बदलत्ती शैक्षणिक धोरणे ज्ञात होण्यासाठी तसेच पालक आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन होऊन इयत्ता १० वी व १२वीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढण्यासाठी *शिक्षण समिती*
निव्रुत्त मुख्याध्यापक *बळवंत वालेकर* यांच्या नेत्रुत्वाखाली स्थापन झाली . माध्यमिक शिक्षक उल्हास म्हेतर सर व सुरेंद्र पारवे सर यांनी अनुक्रमे सेक्रेटरी व खजिनदारपद सांभाळले. शिक्षण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिबिरे आयोजिली गेली . या शिबिरांःमुळे इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढल्याचे आढळून आले. नागोठणे येथील माजी सरपंच विलास चौलकर या समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत . . शिक्षणप्रेमी समाजबंधूंकडून निधी गोळा करून विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात .
*युवकांचे आशास्थान*
४० वर्षांपूर्वी *सुरेश पालकर* यांच्या नैत्रुत्वाखाली युवकाच्याहाती समाजाची सूत्रे आल्यानंतर त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी *दमदार बँटिंग सुरू केली . समाजातील सर्व गावांशी (खाडीच्या अलिकडे व पलिकडे ) संपर्क साधून युवक संघटना मजबूत केली तसे *क्रिकेट* सामनेही चालू केले. आणि पेण* या मध्यवर्ती ठिकाणी समाजाच्या वास्तूसाठी जागा खरैदी करणे व इमारत बांधणे , आर्थिक तरतुदीसाठी लाँटरी काढणे , कारभारात आर्थिक शिस्त लागण्यासाठी समाजमंडळाची नोंदणी (registration )करणे, अलिबाग हे जिल्हा मुख्यालय आहे . जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा रुग्णालयास ह अन्य कार्यालये व शैक्षणिक सुविधा तेथे आहेत . म्हणून भावीकाळाचा विचार करता अलिबाग परिसरात *समाजसभाग्रुह* आसणे अधिक हिताववह आहे म्हणून पेण येथील वास्तु विकून अलिबाग परिसरात जागा खरेदी करणे व वाढत्या महागाईचा विचार करता तेथे काही कोटी रुपयांची सुसज्ज वास्तु उभारण्याचा संकल्प केला. या सर्व घडामोडीत तत्कालीन अध्यक्ष
सुरेश पालकर यांच्यासह
विश्वास घोसाळकर , भाई काटले , शाशिकांत पारवे , भगवान पडगे , विनोद चोगले या अध्यक्षांचा व तत्कालीन कार्यकारी मंडळ सदस्यांचा सिंहाचा वाटा आहे .
*राजेश मेहतर यांची जोरदार मुसडी*
कांबे (जि. ठाणे) येथे समाजमंडळाची वार्षिक सभा सुरू असताना तत्कालीन अध्यक्ष विनोद चोगले यांनी अचानकपणे अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे अध्यक्ष कोण असावा याबाबत चाचपणी चालू झाली . आणि न त्यातच महाडचे तरुण व तडफदार बांधकाम व्यावसायिक *राजेशजी मेहतर* यांचे नाव पुढे आले त्यास सभाग्रुहाची मान्यता मिळाली . या निवडीनंतर *राजैशजींनी* गरुडभरारी मारली.अलिबाग परिसरात समाज सभाग्रुहासाठी जागा खरेदी करणे , नियोजित सभाग्रुहाचा आराखडा तयार करणे या बाबींना प्राधान्य दिले गेले . परंतु खात्यात ५ आकडी रक्कमही शिल्लक नव्हती . प्रकल्प मात्र काही कोटी रुपयांचा होता . अशापरिस्थितीत * राजेशजीं* नी कंबर कसली. खंडाळे येथे जागा खरेदी केली. व बांधकम चालू केले. स्वतः बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे तांत्रिक अडचणी आल्या नाहीत . आर्थिक अडचणींना ते स्वतः सामोरे जात होते . समाजबंधूंनी ५०० रूपयांपासून ५ लाखांपर्यंत देणग्या दिल्या. पण चौली गवळी समाज अल्पसंख्य असल्यामुळे बेडकी फुगून किती फुगणार. परंतु रायगडचे खासदार व ज्ञातीबंधू *सुनिलजी तटकरे साहेब* हा आशृचा किरण ता. त्यांनी तत्कालीन आमदार निधीतून व विद्यमान निधीतून ३० लाख रुपयांचे सहाय्य केले, तत्कालीन आमदार *अनिकेत तटकरे* यांनी १५ लाख रुपयांचा आमदार निधी दिला तर अलिबागचे आमदार *महेंद्रशेट दळवी* यांनी १५ लाख रूपयांचा आमदार निधी देऊ केला. तरीही झोळी भरत नव्हती , शेवटी अध्यक्ष *राजेशजींच्या*
क्रुपाछत्राखाली विविध कामे पूर्णत्वास नेऊन सभाग्रुह लोकार्पणासाठी *गुढीपाडव्याचा*
* मुहूर्त साधला आहे आपले लोकप्रिय . खासदार *सुनिलजी तटकरे** साहेब यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे *राजेशजींच्या गरुडभरारीस सलाम* आणि या कार्यक्रमास माझ्या शुभेच्छा!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 4 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे