बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे बारावीत घवघवीत यश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे बारावीत घवघवीत यश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज मिडीया
अलिबाग: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत फेब्रुवारी – मार्च – २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र [ इ. १२ वी ] परीक्षेचा अॉनलाईन निकाल शनिवार दि. २ मे २०२६ रोजी जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आवासने घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये कला शाखेमधून परीक्षेला बसलेल्या २५ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेचा निकाल ८४ % लागला आहे. तसेच वाणिज्य शाखेमधून परीक्षेला बसलेल्या ३० विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल १०० % लागला आहे.
कला आणि वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९२.७२% लागला आहे.
*कला आणि वाणिज्य शाखेतील पहिल्या तीन क्रमांकांचे मानकरी खालीलप्रमाणे –*
*प्रथम क्रमांक -* नाखवा शर्वरी रवींद्र – ८६ .०० % [ कला शाखा ]
*द्वितीय क्रमांक -* थळे मुग्धा नयन – ८५. ६७ % [वाणिज्य शाखा ]
*तृतीय क्रमांक-* म्हात्रे ध्रुवी राजेंद्र – ७५ .५० % [ कला शाखा ]
*कला शाखेतील पहिल्या तीन क्रमांकांचे मानकरी खालीलप्रमाणे –*
*प्रथम क्रमांक-* नाखवा शर्वरी रवींद्र- ८६ .०० %
*द्वितीय क्रमांक -* म्हात्रे ध्रुवी राजेंद्र – ७५.५० %
*तृतीय क्रमांक -* मोरे श्रावणी देवजी — ६९. ८३ %
*वाणिज्य शाखेतील पहिल्या तीन क्रमांकांचे मानकरी खालीलप्रमाणे –*
*प्रथम क्रमांक -* थळे मुग्धा नयन – ८५.६७ %
*द्वितीय क्रमांक -* गावंड धैर्या पुरुषोत्तम – ७५. ३३ %
*तृतीय क्रमांक -* दरीडगे वेदांती राजेश – ७४.५० %
या उत्कृष्ट निकाला बद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांचे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक या सर्वांचे आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद तसेच ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांनी अभिनंदन केले.



