‘शब्दसुमनांजली’
नाही वर्तन अनुकरणीय
काय कामाची फुशारकी
पाहतील जन आदराने
दाखव मानवा हुशारकी
आठ हात लाकडाच्या नऊ हात ढलप्या काढण्याची सवय बऱ्याच लोकाच्या स्वभावात असते,पण त्यांना हे माहीत नसतं की, ऐकणारी लोकं आपल्यापेक्षा फार हुशार तर आहेतच.त्याहीपेक्षा त्याची कुंडली सर्वांना ज्ञात असते.अशी फुशारकी दाखवून स्वतःचे हसे करुन घेतात.
आज सकाळी सकाळी भाऊंचा तुमचा फोटो पाठवा हा संदेश वाचला आणि लगेच दिला पाठवून. कांही प्रतिक्षेनंतर माझी त्रिवेणी सर्वोत्कृष्ट पोस्टरवर झळकल्याचा संदेश आला नि मन आनंदून गेले.
राहुलभाऊ, सविताताई, वैशालीताई, स्वातीताई, वृंदाताई,तारकाताई, विष्णूदादा,संग्रामदादा प्रशांतभाऊजी यासह माझ्यावर कौतुकाची थाप देणारे शिलेदार समुहातील सर्व ताई दादा यांचे ह्रदयस्थ आभार मानतो.
श्री बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह