0
4
8
3
0
0
थेंब थेंब श्वास
नको नको कृत्रिम
थेंब थेंब तो श्वास
कृत्रिम श्वास मुळीच
नसतो कधी खास….!!
एक व्यक्ती एक झाड
मंत्र सर्वांनी अंगीकारा
मिळेल पाणी सजीवांना
पशु पक्षांना देऊ सहारा…!!
किलबिल आवाजातच
उजाडेल रोजची पहाट
बाळासंगे अंगणात मग
चिऊताईचा चिवचिवाट…!!
साऱ्या ढगाला अडवतील
भली मोठी उंच उंच झाडे
दुष्काळाला ठोकू रामराम
पाणीच पाणी जिकडेतिकडे…!!
निसर्ग आहे खजिना खरा
मिळेल फुकटात रानमेवा
थेंब थेंब श्वास नको कधी
वृक्षतोड थांबव रे मानवा…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
=========
0
4
8
3
0
0



