0
4
8
2
9
3
हवालदिल
हवालदिल जनता सारी,
पुढार्याचे हाल मस्त आहे।
बाकी बेकारी बेरोजगारी ,
गरीबीने लोक ग्रस्त आहे।।
मतापुरतेच दोन्ही हात
जोडतात घरोघरी।
निवडून आले की स्वार्थी
कुणा मानत नाही हरी।।
गुंडगिरी व्याभिचार ईथे
तोंड वर करत आहे।
कोणीच काही बोलत नाही,
असे कसे घडत आहे।।
भोळी भाबडी जनता
अमिषाला पडते बळी ।
पुढारी डाव टाकतात,
खेळे भ्रष्टाचारी खेळी।।
लोकशाहीत कसा काय
चालतो हा तमाशा।
नीतिमूल्ये बदलली आता
बदलला समाज नकाशा।।
शेतकरी अन मजूरांची
दैनाच दिसते न्यारी।
शेतमालास भाव नाही,
म्हणून करे वैकुंठ वारी।।
अन्याय अत्याचार सदा
बलात्कार रोज घडते।
तरी अच्छे दिनचे भाषण
भर चौकाचौकात करते।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.जि. यवतमाळ
0
4
8
2
9
3



