Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्ररायगड

अलिबाग येथे जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करीन: जिल्हाधिकारी

तुषार थळे, प्रतिनिधी

0 5 9 0 3 3

अलिबाग येथे जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करीन: जिल्हाधिकारी

तुषार थळे, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग ( दि.‌१०) माजी लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य अलिबागचे सुपुत्र.‌त्याचे प्राथमिक शिक्षण अलिबाग येथे झाले.‌‌ भारताचे अखंडत्व टिकविण्यासाठी त्यांनी सुवर्ण मंदिरात आपरेशन ब्लू स्टार केले.‌ त्यामुळे शीखीस्तान चळवळ शमली पण लष्करप्रमुख हिटलिस्टमध्ये गेले.‌ त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर दि.‌१० आगष्ट १९८६ रोजी अतिरेक्यांकडून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.‌ शहिद वैद्य साहेबांचा १० आगष्ट हा स्मृतिदिन अलिबाग येथे शासकीय इतमामाने साजरा होण्यासाठी शासनस्तरावर मी प्रयत्न करीन तसेच स्मारकासाठी जागा उपलब्ध केल्यास शासनाकडून निधी आणण्यासाठी मी प्रयत्नरत राहीन असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी श्री किशन जावळे यांनी केले.‌

अ.‌ता.‌शि.‌. प्र.‌मडळाच्या शिशु विहार प्राथमिक शाळेत माजी लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य स्मृतिदिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.‌
प्रारंभी शहिद वैद्य यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुष्पमाला चढविण्यात आली.‌

*जिल्हाधिकारी यांच्याकडून* *धन्यवाद*
वालेकर गुरुजींचे वय ८३ वर्षांचे आहे. तरीही ते सतत धडपडत असतात.‌जनरल वैद्य साहेबांचा पुण्यस्मरण कार्यक्रम ते अनेक वर्षे आयोजित करतात.‌ याबाबत त्यांना धन्यवाद.‌
व्यासपीठावर जिल्हाधिकारी श्री जावळे , माजी नगराध्यक्ष प्रशांतशेट नाईक , उपनगराध्यक्षा मानसीताई म्हात्रे , ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर , आन्ग्रे घराण्याचे वंशज रघूजीराजे आन्ग्रे , आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील स्थानापन्न झाले होते.‌

स्वागतपर भाषणात. ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर म्हणाले , 2026 साल हे जनरल वैद्य यांचे शतकमहोत्सवी वर्ष आहे.‌ लष्करप्रमुख पदावर असताना आॕपरेशनब्ल्यू स्टार केल्यामुळे अतिरेक्यांच्या हिटलिस्टमध्ये जाऊन शहिद होणारे ते एकमेव लष्करप्रमुख आहेत.‌ अशा आगळ्यावेगळ्या शहिदांचा स्मृतिदिन शासकीय इतमामाने साजरा व्हायला हवा तसेच वैद्य साहेबांचे शौर्य पुढील पिढीस ज्ञात होण्यासाठी त्यांचे स्मारक शासनातर्फे जन्मभूमीत होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी वालेकर सरांनी आपल्या स्वागत. पर भाषणात केली.‌ यावेळी उपनगराध्यक्षा मानसीताई म्हात्रे व रघूजीराजे आन्ग्रे यांनीही आपले विचार व्यक्त केले.‌ तसेच सदर कार्यक्रम भव्य स्वरूपात साजरा होण्यासाठी पुढील वर्षी अलिबाग नगरपरिषद हा कार्यक्रम आयोजित करील साजरा करील असे माजी नगराध्यक्ष प्रशांतशेट नाईक यांनी जाहीर केले.

सदर वेळी माजी जिल्हा सरकारी वकील प्रसाद पाटील , , प्राध्यापक पुरुषोत्तम गोखले , माजी नगरसेवक सुकुमार भगत , आदर्श पतसंस्थेचे संचालक विलाप तांडेल , उद्योजक देवदत्त जोगळेकर , साहित्यिक विनोद टेंबुलकर , साहित्यिक राजाराम भगत , माजी मुख्याध्यापक पी.‌ डी.‌ साठे , निवृत्त पी.‌एस्.आय्. चंद्रकांत वालेकर , सामाजिक कार्यकर्ते महेन्द्र ठाकूर , जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष संतोष तावडे , माजी सैनिक राजेंद्र म्हात्रे , माजी सैनिक सुदर्शन पाटील , वीर पत्नी निशीगन्धा काम्बळे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.‌
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श , पतसंस्थेचे व्यवस्थापक उमेश पाटील व आभार प्रदर्शन
सहा.‌शिक्षिका रुपाली कोळी यांनी केले.‌ राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.‌ कार्यक्रम संपल्यावर जिल्हाधिकारी साहेब शिशु विहार मधील विद्यार्थ्यांमध्ये मिसळले.‌ अध्ययनाबाबत चौकशी केली तसेच विद्यार्थ्यांसमवेत फोटो काढण्यास अनुमती दिली.‌

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 0 3 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे