
0
4
0
9
0
3
पाठवणी
लगीनघाई सरली
लेक निघाली सासरी
माय पुसते पदरानं
डोळे जन्मदात्याचे भरती
.
खेळ खेळता अंगणी
भांडाभांडी भावंडाची
सुनी झाली रे हवेली
उरली आठवांची गाणी
तेच अंगण तोच झोका
स्वप्न आभाळी पाहीले
स्वप्नातल्या राजकुमारा
अवचित लेकिने वरीले
नको बंगला गाडी माडी
सासर मायेचे राहू दे
लाडाकोडात वाढली
सुखी सासरी नांदू दे
ओलांडून उंबरठा
पाऊल पुढे पडतांना
हसू आणि आसू डोळी
पाठवणी लेकीची करतांना
सविता धमगाये, नागपूर
============
0
4
0
9
0
3





