0
4
8
2
9
4
श्वासाची किंमत
जीवन आणि मरण, यात फारसे अंतर नसते
काळ वेळ येताक्षणी, श्वासाची किंमत कळते.. //
प्राणवायूची नळी केवळ, धडधड चालू ठेवते
तीव्र झोत काळाचा, प्राणज्योत उगीच तेवते.. //
क्षीण नजर मलूल चेहरा, त्राणही अवघे सरते
सगे सोयरे, इष्ट मित्र, हिम्मत सार्यांची हरते.. //
आराधना आनाभाका, लाख यत्न मन करते
काळासमोर मानवी शिकस्त, कूचकामी ठरते.. //
कासावीस प्राणपाखरू,अखेर कुडीतून उडते
कृत्रिम श्वास एक भास, शेवटी अघटित घडते.. //
पद, प्रतिष्ठा, राव, रंक, वय ही क्षणिक असते
राहते खाली फक्त कलेवर, नावही अंती पुसते..//
जगण्यावर मन भाळते,पर मरणावर का रडते
सरणावर राख होते, सांगा काय कुणाचे अडते..//
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
==============
0
4
8
2
9
4



