0
4
8
3
0
0
अखंड शौर्य संभाजी
मृत्यू ही ओशाळतो,
जेव्हा संभाजी आठवतो//धृ//
धगधगत होता रणसंग्राम,
दुष्मनांचे काळीज तुटले,
शंभूराजेंच्या पराक्रमाने,
सिंहासन हादरून सुटले//1//
मृत्यूही ओशाळतो……….
=
मरणासही शरम वाटली,
पाहून त्यांचा धैर्यसिंधू,
त्यागाच्या त्या महासागरात,
ओशाळला मृत्यू।।2।।
मृत्यू ही ओशाळतो…….
कैदेतही ताठ मस्तक,
ना भिक, ना याचना,
छळले तरी निर्धार ताठा,
होती धर्मास निष्ठा//3//
मृत्यू ही ओशाळत…..
शब्दातही होती नीती,
अंगी आली ना भीती,
मृत्यूही घाबरून म्हणाला,
“हा तर अमर ज्योती!”।।4।।
मृत्यूही ओशाळतो…….
निखाऱ्यांवरती चालत गेले,
विझवू शकले ना कोणी,
त्यांच्यात वीरता ही अशी,
मृत्यूही मागे पाहे वळूनी।।5//
मृत्यू ही ओशाळतो…..
उर्मिला राऊत
फ्रेंड्स कॉलनी नागपूर
0
4
8
3
0
0



