0
4
8
2
9
4
ओल्या मातीचा सुगंध
निसर्गाची किमया न्यारी
शेती बागे आनंदाने फुलली
धरणी माय ओलीचिंब झाली
पशू पक्षीही गातांना दिसली
ओल्या मातीचा सुगंध
तृप्त करी तनामनाला
पानं फुलं गालात हसली
सौंदर्य वाटते प्रत्येक क्षणाला
झाडं वेली बहरली
हिरवळीने अवनी सजली
वाहे आसमंती वारे
इंद्रधनुचे रंग ल्याली
सृष्टी नटली पावसाने
धूंद झाली वसुंधरा
वनामध्ये नाचे मयुर
फूलवूनिया रंगाचा पिसारा
ओल्या मातीच्या सुगंधाने
डोंगर दऱ्या भिजल्या
रेशमी शालू नेसून
सौंदर्यवती त्या खुलल्या
अर्चना राजू ईंकने
लाखांदूर,भंडारा
============
0
4
8
2
9
4



