
0
4
8
2
8
4
वृक्ष वेल
लावली मी अंगणात
वृक्षवेल फुलांची
रोज घालते पाणी
फुले लागती लाल रंगाची
इतरही लावली झाडे
सावलीचा मीळे गारवा
येता जाता पादचारी
घेई अनुभव नवा नवा
पर्यावरण राही शुद्ध
साधून घेई समतोल
निसर्ग किती हितकारी
देई आम्हा विविधा अनमोल
सूर्याची सोनेरी किरणे
पडती सर्व वृक्ष वेलीवर
जीवन सत्व मिळती त्यांना
वाढून येती लवकर
अशा किती वेली
असती रान माळात
रंगी बिरंगी दिसती फुले
घर करून घेती मनात
केवलचंद शहारे
सौंदड, जि. गोंदिया
0
4
8
2
8
4



