Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमुंबई

अ. ता. शि. प्र. मंडळाचा वर्धापन दिन साजरा

तुषार थळे, प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

अ. ता. शि. प्र. मंडळाचा वर्धापन दिन साजरा

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग: येथील तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा ८७ वा वर्धापनदिन नुकताच संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळेत मंडळाचे अध्यक्ष बळवंत वालेकर यांच्या अध्यक्षतेखाली सजरा झाला. प्रारंभी संस्थेच्या संस्थापकाःच्या प्रतिमेस पुष्पमाला चढविल्यानंतर शिशुविहारच्या मुख्याध्यापिका सौ. कल्याणी वेखःडे यांनी स्वागत केले.

त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष वालेकर सर यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या १९३७ सालापासून पासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.पारतंत्र्य काळातील वाडगाव ही संस्थेची पहिली शाळा असून या शाळेचे उद्घाटन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी केल्याचा प्रसंगही त्यांनी उद्ध्रुत केला. संकट काळात संस्थेच्या ५२ शाळंचा कारभार हाकताना मंडळाचे मानद सेक्रेटरी ग. भा. पंडित यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

या संस्थेचे अध्यक्षपद भाऊसाहेब लेले (वकील) दानशूर शंकरराव हळदवणेकर , बंडूभाई म्हात्रे , द. शं . गोडबोले , मा. वा. जोशी (वकील ) या दिग्गजांनी भूषविले असून पत्रकार बळवंत वालेकर विद्यमान अध्यक्ष आहेत . सदर संस्थेकडे आज ९ अनुदानित प्राथमिक शाळा असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावाही अध्यक्षांनी घेतला. त्यानंतर संस्थेचे सेक्रेटरी द. ल. माळवी व संचालक सुकुमार भगत यांनीही मनोगत व्यक्त केले.शेवटी मुख्याध्यापकानी आभार प्रदर्शन केले.

या वर्धापनदिनास संस्थाध्यक्ष बळवंत वालेकर , संचालक सुकुमार भगत , .सेक्रेटरी द. ल. माळवी , ज्येष्ठ नागरिक संजय सावंत – बिर्जे पालकवर्ग , मुख्याध्यापिका व त्यांचा सहकारी वर्गआणि विद्यार्थी उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे