ई-पेपरकवितादेश-विदेशनागपूरनांदेडपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
हवालदिल
श्री बळवंत शेषेराव डावकरे
0
4
8
2
9
7
हवालदिल
खरीपानं दिला दगा
कसं निस्तरावं त्यानं
भीस्त रब्बीवर सारी
सांगे त्यासं त्याचं मनं
फिटता फिटेना त्याची
पहिलीच ती उसनवारी
गेला सावकारी दारावर
गहाण मंगळसूत्र दप्तरी
पेरलं धान्य आशेवर
खेळून धरणीशी जुगार
कोंब अंकुरले धरेवर
शालू हिरवा अंगावर
पीक उधानले शिवारी
बळीराजा सुखावला
दिस येतील सुखाचे
मनोमनी तो हरखला
अवकाळी या पावसाने
घास तोंडचा हिरावला
झाला पोशिंदा हवालदिल
खेळखंडोबा मेहनतीचा झाला
श्री बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जि नांदेड
0
4
8
2
9
7



