Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरविदर्भसाहित्यगंध

कु.हर्षिता पाटील इयत्ता चौथीत ९६% घेऊन सर्वप्रथम

स्व. देवकीबाई बंग मराठी प्राथमिक शाळेत सलग चौथ्यांदा प्रथम येण्याचा मान

0 4 8 2 8 4

कु.हर्षिता पाटील इयत्ता चौथीत ९६% घेऊन सर्वप्रथम

स्व. देवकीबाई बंग मराठी प्राथमिक शाळेत सलग चौथ्यांदा प्रथम येण्याचा मान

नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर चे संस्थापक अध्यक्ष यांची सुकन्या कु. हर्षिता पाटील हिने सलग चौथ्यांदा सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला असून, यंदा हर्षिता हिला इयत्ता चौथीत ९५.५५% गुण प्राप्त झाले आहे.

स्व. देवकीबाई बंग मराठी प्राथमिक शाळा हिंगणा, ता.हिंगणा जि. नागपूर येथे शिकत असलेल्या हर्षिताला वाचनाची, लेखनाची आवड असून चित्र काढणे हा छंदही ती बालपणापासून जोपासत आहे. आज जाहिर झालेल्या निकालानंतर वर्गक्षिका छाया बोरबर, मुख्याध्यापिका भोपे मैडम यांनी हर्षिताचे शैक्षणिक भेटवस्तू देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी सर्व शालेय शिक्षक वृंद व कर्मचा-यांना मिठाई वाटप करण्यात आली. याप्रसंगी मराठीचे शिलेदार संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील प्रामुख्याने उपस्थित होत्या.

नुकत्यात घेण्यात आलेल्या ‘एसपीआय’ प्रवेशपात्र पूर्वपरिक्षा संरक्षण प्रबोधिनीचा निकाल दि. २८ एप्रिल २०२५ ला जाहिर झाला. १७००० विद्यार्थीपैकी एक हजार विद्यार्थी पात्र ठरले असून यामध्ये अखिलेश पाटील ७ व्या रँक ने पात्र ठरला असून लवकरच म्हणजे दि ६ मे ते १३ मे या कालावधीत मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना ११ वी त एसपीआय मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व स्तरातून अखिलेश पाटील व हर्षिता पाटील या बहिण भावांचे कौतुक करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे