
0
3
4
5
8
9
कौतुकालय
मराठी भाषेचा,चालतो जागर,
भरीती घागर,ज्ञान रुपी..//
कौतुकालयात,वावर आमचा,
माहेरपणाचा,दिनरात..//
शिलेदार सर्व,आनंदे लिहती,
लेखणीस गती,मिळे इथे..//
तोडक्या मोडक्या,भावनांचा भावं,
स्वीकारी हे गावं,कौतुकाने..//
उपक्रम छान,विजेत्याचा मान,
सन्मानाचे दान,यथोचित..//
मनोगता वाहे,भावनांचा पूर,
कौतुकाचे सूर,गाती नित्य..//
दैनंदिन स्पर्धा,परीक्षण पर्व,
परी नाही गर्व,शिलेदारी..//
कौतुकालय हे,कुठेच असले,
मला ना दिसले,आजवरी..//
अभिनंदनीय,शुभेच्छा अर्पिती,
ओंजळ ना रीती,होई कधी..//
मानुया स्वतःस,भाग्यवंत आज,
शिलेदार साज,शोभे शिरी..//
संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात
=========
0
3
4
5
8
9