Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

माता रमाईच्या त्यागामुळे बाबासाहेब झाले’; विलास गजघाटे

नागपूर शहर प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

माता रमाईच्या त्यागामुळे बाबासाहेब झाले’; विलास गजघाटे

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

नागपूर (दि ८): पवित्र दीक्षाभूमी स्मारक समिती पय्यामेत्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाईला अभिवादन 7 फेब्रुवारी रोजी अभिवादन करण्यात आले. त्यावेळी पवित्र दीक्षाभूमीवर विलास गजघाटे, भदंत संघरत्न मानके, जपानी भिख्यूसंघ, पूज्यलामा, भदंत डॉ. रमेशचंद्र नेगी (लदाख) भदंत याकोमाजी (जपान) सुझेन आराही जी डॉ. आसामी सासाकी, प्रो . सातोशी मितानी भन्ते नागदिपांकर, भंते धम्मशिखर, भदंत बोधी, भंते शिलवंश भदंत डॉ. मेन्तानंद यांच्यासह विदेशी व भारतीय भिक्षु गण यांनी धम्म दिक्षा प्रदान करून माता रमाईला अभिवादन केले.

माता रमाईने पदोपदी दुःख कष्ट सहन करून समाजासाठी जो त्या केला व बाबासाहेबांच्या पाठीशी सदैव सावलीसारखी उभे राहून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घडविले त्याला जगाचा इतिहासात तोड नाही लहानपणी आई बाबांच्या मायेचा पदराला पोरखी झालेल्या रमाईने लग्नानंतरही आप्तजनांचे रामजीबाबा, सासू जिजाबाई मुलगी इंदू मुलगा गंगाधर, यांचे मृत्यू पाहिले. गाईचे शेण गोळा करणे, गवऱ्या थापने आणि अनेक कबाडकष्ट करून बाबासाहेबांच्या संसार चालविला. अशा या महान मातेंना मनःपूर्वक अभिवादन ! मानाचा मुजरा करतो असे वक्तव्य याप्रसंगी विलास गजघाटे यांनी व्यक्त केले.

आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक भदंत नागदीपांकर यांनी केले तर संचालन शरद मेश्राम व आभार मधुकर मेश्राम यांनी केले. याप्रसंगी सुनील भोसले देवाजी रंगारी राजकुमार वंजारी सुरेश वानखेडे कैलास राव यांच्यासह असंख्य आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे