Breaking
क्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

कुहीतील पचखेडीत रंगांच्या उत्सवातून जोपासला सामाजिक एकोपा

पचखेडीत धुलीवंदन उत्साहात साजरा; रंगात रंगले पत्रकार मित्र

0 5 1 6 5 2

कुहीतील पचखेडीत रंगांच्या उत्सवातून जोपासला सामाजिक एकोपा

पचखेडीत धुलीवंदन उत्साहात साजरा; रंगात रंगले पत्रकार मित्र

कार्यक्रमाला राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघपाल गडलिंग, महाराष्ट्र उपाध्यक्ष गजानन ढाकुलकर यांची उपस्थिती

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर/ कुही: (दि ३) तालुक्यातील पचखेडी येथे धुलीवंदनाचा सण अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. रंगांच्या या उत्सवात गावातील अबालवृद्धांनी एकत्र येत आनंदाची उधळण केली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शेतकरी व शेतमजूर नेते राजानंद कावळे यांनी उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांना रंगोत्सवाच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघपाल गडलिंग, महाराष्ट्र उपाध्यक्ष गजानन ढाकुलकर, ज्येष्ठ पत्रकार गुरुदेवभाऊ वंदिले, विनोद निकुडे, लेखक आणि कवी हेमंत बारसागडे तसेच पचखेडीचे सरपंच विवेकभाऊ मेश्राम आणि सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. गावातील नागरिकही मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
याप्रसंगी बोलताना राजानंद कावळे म्हणाले की, धुलीवंदन हा केवळ रंगांचा सण नसून मनातील मतभेद आणि द्वेष दूर करून एकमेकांप्रती प्रेम व आपुलकी वाढवण्याचा दिवस आहे. समाजात बंधुभाव, शांतता आणि प्रगतीची भावना वृद्धिंगत व्हावी, हीच या सणामागची खरी संकल्पना आहे.

कार्यक्रमादरम्यान सर्व ग्रामस्थांनी एकमेकांना गुलाल आणि रंग लावून शुभेच्छा दिल्या. गावातील सरपंच आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला होता. संपूर्ण गावात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी या माध्यमातून सामाजिक एकात्मतेचा एक आदर्श संदेश दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे