Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

बालविश्व

वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा पुणे

0 4 8 2 9 0

बालविश्व

मी गेली 35 वर्ष लहान मुलांच्या मध्ये वावरत होते. मी प्रायमरी शिक्षिका होते. नुकतीच रिटायर झालेली आहे. एक ते चौथीच्या मुलांशी संबंध असल्याने मला लहान मुलांच्या खोड्या काय असतात हे माहिती आहे. प्रत्येक मुलाच्या काहीतरी वेगळ्या खोड्या असतात. आजही मी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाते लहान मुलांशी संवाद चालते ‘रमाची पाटी’ ही माझी शॉर्ट फिल्म दाखवते. त्यावर आधारित एक सेक्शन घेते कविता कशी करायची? हे लहान मुलांना शिकवते आणि माझ्या विश्वात मी परत रममाण होत असते. लहान मुलांशी माझे नाते अजूनही जोडलेले आहेच.

पण आज शाळेतील मुलांऐवजी मी माझ्या घरात पाच नातवंडे आहेत त्यातील दोन लहान नातवंडांच्या खोड्या काय हे सांगणार आहे. आजची ही पिढी खूप हुशार आहे. वागण्यात, बोलण्यात, समजून घेण्यात सगळ्याच ठिकाणी. तर एक नात सगळ्यात छोटी चार वर्षाची त्रिशिका. प्रचंड हुशार, बिनधास्त, लाघवी,प्रेमळ, आणि हा फटकन बोलणारी सुद्धा. समोर कोण आहे हे पाहणार नाही. तिचे शिक्षक असू देत, तुझे नाना,नानी असू देत, नाही तर तिचे आजी,आजोबा कोणीही असू देत त्याला ती उलट उत्तर देणारच. डॅशिंग आणि तडफदार मुलगी आहे. खूप बोलकी आहे. बोबडे बोलती बोललीच नाही. आणि मोठ्या बहिणींच्यामुळे ती नृत्य देखील अतिशय सुंदर करते. अशी माझी त्रिशिका.खोडकर पण तितकीच.घरात हा पसारा घालून ठेवते. आईचे मेकअप सामान स्वतः कसेही वापरते. घरातील भिंती रंगवते. मोठया दीदीवर हुकूम चालवते.

विक्स, अमृत्तांजन स्वतः च्या तोंडाला लावून आई- बाबांना रागाचा पारा वाढवते. अशी ही खोडील त्रिशा आहे सर्वांची खूपप लाडकी.शाळेत सुद्धा मुलांची खोडी काढते. टीचरला उलटी उत्तरे देते. पण अभ्यास पूर्ण करते. हुशार आहे. ती एक दिवस शाळेत गेली नाही तर सर्वाना करमत नाही. अगदी प्रिंसिपल सुद्धा तिच्या खूप प्रेमात आहेत. तिच्याच बरोबरचा दुसऱ्या मुलीचा मुलगा. माझा चार वर्षाचा नातू मनू त्याला आम्ही लाडानं म्हणतो. त्याचे खरे नाव आहे नयन. नयन हा फ्री मॅच्युअर बेबी आहे. अगदी साडेसहा महिन्यात झालेला. त्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टी ह्या स्लो आहेत. झाला त्याच वेळेला अडीच महिने हा आयसीयू मध्ये होता. त्याच्या डोळ्यावर तीन वेळा लेझर ट्रीटमेंट झाली. त्याच्या डोळ्याच्या काही रक्तवाहिन्या डेव्हलप झालेल्या नव्हत्या.

वय वर्ष तीन उलटून गेले तरी सुद्धा याला जास्त काही बोलता येत नव्हते. पण जसा तो त्रिशिकाच्या सानिध्यात आला तसा त्याला बोलता येऊ लागले. त्रिशिकामुळे तो बऱ्याच गोष्टी शिकला. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात, एकमेकांना खूप जीव लावतात. त्रिशिका काय येणार म्हटलं की मनु खुश असतो आणि म्हणून म्हटलं की त्रिशिका खूप खुश असते. दोघेही भेटले असता खूप आनंदी होतात आणि शेवटी एकमेकांचा हात सोडताना दोघेही रडायला लागतात एवढे हे प्रेम पाहून आम्हा मोठ्यांना खूप आनंद होतो. त्रिशिका आहे त्याच्याच वयाची पण मनू हाताने खात नाही म्हटल्यावर ती स्वतःच्या हाताने भरवते. आणि हा पण लाडोबा तिच्या पुढ्यात बसतो आणि तिला भरवायला लावतो.अशी आमची ही जोडी.

अशा लहान मुलांच्या जोड्या प्रत्येकाच्या घरोघरी आहेत. प्रत्येकाला विविध अनुभव आपल्या मुलांकडून येत असतात. माझ्या सांगण्याचा हेतू जोरा वेगळा आहे आणि तो म्हणजे मला या आठवड्याभरामध्ये आमचा मनू जरा वेगळा दिसला तर काय वेगळेपण आहे हे सांगावेसे वाटते.मनुला गाड्यांचे खूप वेड आहे. पण घरी आलेली रोजचे नवे खेळणे त्याचे पोस्टमार्टेम अगदी त्याच दिवशी होते.त्याला उत्सुकता असते काय आहे या वाहनांमध्ये? असा हा गाड्या प्रिय मनू..

मनूचे मामा- मामी अमेरिकेहून आलेले आहेत. म्हणून त्याची मामी कोणालाही वाटायची नाही. आम्ही कुठे गेलो तर तिच्या एका हातालात्रिशिका असते आणि तिच्या दुसऱ्या हाताला मनू असतो.तिला दोघेही सोडत नाहीत. तिने त्रिशीकाकडे जरा जास्त लक्ष दिले तरी मनू चिडतो आणि मला बोलतो’नानी आपण नवीन मामी आणू.’ मग आमच्या सगळ्यांचा हशा पिकतो. मनुला खूप समजून सांगावे लागते. समजून सांगितल्यानंतर लगेच तो शांत होतो. मग ज्याच्यावर राग येईल तो त्याला बदलायचा असतो. मग त्याची मम्मा, नाना, मामा कोणीही असु दे. त्याला ते बदलायचे असतात.

त्याचा राग आपल्याला घरी आला तरी तो म्हणतो” मनू नवीन हवा आहे का तुम्हाला? ” व्यक्ती नवीन बदलणे ही संकल्पना त्याच्या डोक्यात कुठून आली हे समजले नाही. आणि बदलायची जी व्यक्ती आहे ती दुकानात मिळते,आपण दुकानात जाऊ आणि नवीन मम्मा घेऊन येऊ.नवीन नाना घेऊन येऊ. नवीन मामा घेऊन येऊ.असे तो बोलत असतो. त्याच्या ह्या बोलण्याचे खूप आश्चर्य वाटते. असा हा आमचा म्हणून प्रचंड हुशार आहे. त्याच्या नानाचे आणि त्याचे पटत नाही. माहित नाही पण दोघं एकमेकांशी धड बोलत नाहीत. पण त्याचा नाना शांत बसला की तो मला येऊन विचारतो बघ त्याला काय झालंय काय झालंय? यातून असे दिसून येते की त्याला घरातल्या लोकांची काळजी पण तेवढीच आहे.

मी देखील ऐनवेळी जरा आडवी झाले तर विचारणार ” तुला काय झालंय, पोटं दुखतंय का? उठ, उठ.. ” त्याच्या अशा काळजी वाहू प्रश्नाने तो किती आपली काळजी घेतो हे समजते आणि त्यांना आपल्याबद्दल किती प्रेम आहे हेही समजते. अशी ही माझी चार वर्षाची नातवंडे व त्यांच्यात रमणारी मी…

नातवंडे आहेत खूप हुशार
करतात अभ्यास खरातर नीट
मस्ती खूप घालतात घरीदारी
आहेत वागायला खूप धीट…

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे