Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

हुजूरपागा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

हुजूरपागा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

पुणे (दि १६ डिसे.): महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल, कात्रज–मांगडेवाडी तर्फे वार्षिक स्नेह संमेलन “Coastal Rhythm ” ह्या विषयावर अण्णा भाऊ साठे सभागृहात उत्साहात पार पडले. विद्यार्थिनींनी समुद्राचे निसर्गसौंदर्य, कोळी संस्कृती, सागरी जीवसृष्टी आणि पर्यावरण संवर्धन यावर आधारित नृत्य, नाटक आणि संदेशप्रधान प्रस्तुती सादर केल्या.

म.ग.ए.सोसायटी च्या उपाध्यक्षा श्रीमती हिमानी गोखले, सचिव रेखा पळशीकर, सभासद श्रीमती गौरी गोडसे,सभासद श्री.डॉ.सुनिल जगताप, सभासद श्री.लक्ष्मीकांत मुंदडा ह्या सर्व नियामक मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला. उत्कृष्ट आयोजन, विद्यार्थिनींचा आत्मविश्वास आणि शिक्षकांचे परिश्रम यामुळे स्नेह संमेलन अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका श्रीमती कीर्ती पंडित आणि पर्यवेक्षिका श्रीमती अर्पिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे