Breaking
ई-पेपरकविताबीडसाहित्यगंध

कसं असतं ना समाजाचं.

शर्मिला देशमुख -घुमरे

0 4 8 2 9 7

कसं असतं ना समाजाचं.

कसं असतं ना समाजाचं…
मनासारखं वागलं तर खूप भारी
एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही
तर संपून जाते गोडी

कारणं असतात त्या पाठीमागे
पण जाणून घ्यायचं नसतं
बरोबर वागणाऱ्याने नेहमीच
बरोबरच वागायचं असतं

आपलंही काही चुकलं असेल
स्वतः पर्यंत यायचं नसतं
दोषी समोरच्याला ठरवून
स्वतः मोकळं व्हायचं असतं

अंतर्मुख होऊन कधी
आत्म्याला सामोरे जायचं नसतं
खरे खोटे काहीही असो
स्वतःचच खरं दाखवायचं असतं

दुखत असतील कोणाच्या भावना
त्याचं काही देणं घेणं नसतं
मनाच्या विरोधात कोणी गेले की
अहंकाराचं लांच्छन लावायचं असतं
कसं असतं ना समाजाचं…..

शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जि.बीड
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे