Breaking
ई-पेपरकवितागोंदियासाहित्यगंध

उहापोह

रंजना राहुल ब्राम्हणकर ता.अर्जुनी/मो.जि.गोंदिया

0 6 4 5 2 9

उहापोह

दडलाय मनात आठवणीचा उहापोह|
सांगू कुणाला आवरत नाही मोह||१||

विचारांच्या लाटांवर चालते ही नाव|
शोधते स्वतःचाच विसरलेला ठाव||२||

मनात चालतो सतत एक उहापोह|
काय खरे काय खोटे खोलवर आहे डोह||३||

यश अपयश आणि चुका यांचा हिशोब|
हुरहुरत्या मनाला लागतो वेगळाच लोभ||४||

विचारांचे किती जाळे विणावे|
प्रश्नांच्या काहूरात काय? काय?शोधावे||५||

उत्तर जरी मिळत नाही करतो मंथन|
जगण्याचे मंत्र आहे करावे रोज चिंतन||६||

थांबत नाही मनाचा सहज स्वभाव|
उहापोहाच्या प्रवासात मिळतो खरा भाव||७||

रंजना राहुल ब्राम्हणकर
ता.अर्जुनी/मो.जि.गोंदिया
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 4 5 2 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे