ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरदेश-विदेशनागपूरमहाराष्ट्रसाहित्यगंध
वसंतोत्सव
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0
4
8
2
8
2
वसंतोत्सव
ऋतुचक्र फिरे निरंतर
शिशिर कहर ओसरला
आता रंग,गंध, उधळत
वसंत बहर अवतरला.. //
कधी ना कधी विरतात
पानगळतीच्या वेदना
आणि त्या जखमातून
स्फुरतात सुख संवेदना.. //
हे ऋतु बदलांचे संकेत
वसंताचा जादूई स्पर्श
नाजूक पर्ण पालवीचा
जीर्ण खोडालाही हर्ष.. //
नाना रंग गंध उधळत
हजारो सुमने फुलली
करूनीया सोळा शृंगार
अवघी वसुंधरा खुलली.. //
प्रसन्नचित्त पशू पक्षीही
घुमे कोकिळेचा आलाप
सप्तसूर आणि सप्तरंग
जिकडे तिकडे मिलाफ.. //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
4
8
2
8
2



