ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
आजी गं आजी
सौ विमल धर्माधिकारी वाई, जि.सातारा

0
5
1
7
5
8
आजी ग आजी
आजी ग आजी
घे ना मला कुशीत
भीती वाटते अंधाराची
झोपू दे हाताच्या उशीत .
.आजी ग आजी
तुझे केस कसे पांढरे?
बाळा ,होते आधी काळे
वयोमानाने झाले पांढरे .
आजी ग आजी
गाणी गातेस गोड तू
छान छान गोष्टी सांगतेस तू
शाळेत जात होतीस का तू?
आजी सायकल येते तुला?
शिकवशील का मला ?
मोबाईल फोन लावायला
शिकवीन मी तुला .
आजी शाळेत आहे समारंभ
आजी आजोबांना खासआमंत्रण
दोघांनीही यायचं बर का
माझं करायला औक्षण .
सौ विमल धर्माधिकारी
वाई, जि.सातारा
0
5
1
7
5
8



