मी सारी, जिंदगी माझी
राजश्री मिसाळ ढाकणे ता. जिल्हा बीड

मी सारी, जिंदगी माझी
कधी वाचणार आहे कधी लिहिणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला पुजनार आहे
असो ऋतू शिशिर वसंत श्रावण हिरवा
मी माझ्या लेखणीत तुला सजविणार आहे
असो सण उत्सव कोणते समारंभ भारी
मी सारे अलंकार तुला मढविणार आहे
तुझे लाघवी बोल सारे बालकांच्या वाणीत
मी बोबड्या बोलाचे कौतुक ऐकणार आहे
फार संघर्ष झेलून अभिजात दर्जा लाभे
मी आनंदी क्षण तुझे गुणगुणणार आहे
माय तुझे सुसंस्कार रक्तातच भिनलेले
मी क्षणाक्षणी तुझा गौरव करणार आहे
माय मराठी आहे एकटी वाघीण विश्वात
मी दूध पिल्याने तुझे गुरगुरणार आहे
सर्व भाषांची आहे गं माझी माय महाराणी
मी विनम्रतेने तुझ्या पायी लोळणार आहे
स्वतः चा जन्मदिन अर्पिला कुसुमाग्रजांनी
मी थोर मराठी साहित्यिक वंदिनार आहे
लाभली माय मराठी पावन भूमी आमची
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
========



