Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 4

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट नऊ🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : फेरीवाला📘*
*🔸मंगळवार : ०६ / जानेवारी /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*फेरीवाला*

आला आला फेरीवाला
भाजीपाला घेऊन आला
होता सगळा ताजा ताजा
पटकन कसा विकल्या गेला

आला आला फेरीवाला
रसरशीत फळे घेऊन आला
घेण्यासाठी गर्दी झाली खूप
काहींना माल नाही मिळाला

आला आला फेरीवाला
खेळणी सुंदर घेऊन आला
वाघ, हत्ती,उंट,घोडे
ससा त्यांच्यावर शिरजोर झाला

आला आला फेरीवाला
भांडी सगळी घेऊन आला
बायका सगळ्या झाल्या गोळा
सगळा तिथे गलका झाला

*मीनाक्षी काटकर*
*दारव्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀✨🌀♾️♾️♾️♾️
*फेरीवाला*

फेरीवाल्याने आणली
रंगी-बेरंगी खेळणी
बालकांची गर्दी जमली
आले सारे अंगणी ॥१॥

पाहु लागले खेळणी
गुबगुबीत शुभ्र ससोबा
घेतला कुणीकुणी
दिसला डोलणारा नागोबा॥२॥

मेणाची बाहुली
आणि पट्टेरी झेब्रा
होती,मूर्ती विठू माऊली
व सरपटणारा कोब्रा ॥३॥

फुगे तांबडे लाल
लाकडाचा काऊ
आणि रबरी पाल
इवली,कापसाची चिऊ ॥४॥

प्लास्टिकची माऊ
डोळे फिरवी गरगर
हा पहा,मातीचा आऊ
मुलांनो या लवकर ॥५॥

शिवाजीचे मावळे
सैनिक होते,हजर
गोळा झाले सगळे
फेरीवाल्या समोर ॥६॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✨🌀♾️♾️♾️♾️
*फेरीवाला*

फेरीवाला येतोय,आमच्या दारात,
पाहिजे ते घ्या, देतो स्वस्त दरात..

लेकराला खाऊ आणि खेळायचे,
सगळे काही आहे म्हणे विक्रीचे..

फेरीवाला फिरतो गल्ली बोळाने,
बंबई मिठाई,कधी खारे शेंगदाणे..

विक्रीला आणले बाळाचे खेळणे,
गात असे बालगीत नवनवे गाणे..

या रे या,लवकर या,खेळणी घ्या,
घेणार ना जास्त आला भाव द्या..

चणे,फुटाणे,आईस्क्रिम गारगार,
देतो म्हणे तुम्हां वजन भारंभार..

भूक लागतेय फिरून गाव सारा,
टेकवी हळूच त्याचा तो पसारा..

पोटाची खळगी, फिरे दारोदारी,
फेरीवाला तो उदरनिर्वाह करी…

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✨🌀♾️♾️♾️♾️
*फेरीवाला*

फेरीवाला आला
फेरीवाला आला
गाव गल्लीत
फेरीवाला आला

फेरीवाल्या भोवती
मुले गोळा झाली
गाडीतल्या खेळणी
पाहू लागली

खेळणी असे फार छान
माकड असे उड्या वान
मनोरंजनाची असे मजा
आनंद झाला त्यांचा ताजा

आईच्या मागे लागली मुले
खेळणी साठी मन झुरे
सोबत आणले आईला
खेळणी घेऊन खुश झाला

कुणी घेतले विमान
कुणी घेई घोडा गाडी
कुणी घेतली झूक झूक गाडी
खेळण्यात रमून गेली मुले

*पुरुषोत्तम ठोंबरे*
*ता.जि.नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✨🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*फेरीवाला*

गल्लीमध्ये घंटा वाजवीत
आला आला फेरीवाला
गोड गोड बोलून विकतो
खेळणी लहान मुलाला….!!१!!

कोणाला हवेत रंगीबेरंगी
फुगे, चेंडू नि बाहुली छान
येईल मज्जा खूप बाळांनो
खेळताना हरपेल देहभान…!!२!!

चिक्की लाडू वेफर्स मुरकुल
आज देतो स्वस्त फार फार
नाही जायचं लांब कोणाला
बिचारा फेरीवाला दारोदार…!!३!!

लहान मोठे सारेजण मग
फेरीवाल्याकडे घेती धाव
ऊन वारे पावसात सुद्धा
हिंडत असतो गावोगाव…!!४!!

फेरीवाला शिकवी जणू
जीवनाचे खरे तत्वज्ञान
कष्टाचीच भाकरी आहे
जगण्याचा आनंद शान…!!५!!

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✨🌀♾️♾️♾️
*फेरीवाला*

आला आला फेरीवाला
कपडे घेऊन आला
रंगीबिरंगी आणले कपडे
त्याने कमी भावात दिला

कोणी घेतली साडी
तर कोणी घेतली बंडी
फेरीवाल्यांचे छान कपडे
फिरत असते इकडे तिकडे

आला आला फेरीवाला
गुब्बारे घेऊन आला
लाहान मुले झाले गोळा
त्या सर्वांना मिळाला

आला आला फेरीवाला
बुडीचे बाल वाला
ते लाल लाल दिसतात
मस्त गोड गोड लागतात

आला आला फेरीवाला
भाजीपाला घेऊन आला
आलू कांदे टमाटर आणले
सर्वांनी घेतले सर्वांना मिळाले

आला आला फेरीवाला
सर्वच फळ घेऊन आला
आणले जाम संत्रा केळी सेप
बरेच पैसे जमवून गेला

फेरीवाला घरी आल्यावर
बाहेर जायचं वाचते आपला
आयती येत असतो दारात
वेळ ही वाचतो आपला

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✨🌀♾️♾️♾️♾️
*फेरीवाला*

आला आला फेरीवाला
खाऊ,खेळणी विकायला
दे ना खेळणी घेऊन मला
राजू आईला म्हणाला

नाही भांडणार छोटीशी
अभ्यास करेन खूप सारा
तुला कामात मदत करेन
आवरून सगळा पसारा

लाल लाल मोटार ही
छान छान दिव्यांची
इटुकला बघ हा ससा
उघड मीट ही डोळ्यांची

बनीने घेतला हा घोडा
दुडुक दुडूक धावतो
मनीचा पोपट कसा
विठू विठू बोलतो

रेवडी,चिक्की गुळाची
छान छान चवीची
कुरकरीत चुरमुऱ्यांना
सोबत खाऱ्या दाण्यांची

फेरीवाल्या भोवताली
मुले सारी झाली गोळा
खेळणी नी खाऊसाठी
करू लागली गलबला

दर रविवारीच येतो
गल्लीत हा फेरीवाला
खाऊ, खेळणी घेऊन
ऊत मुलांच्या दंग्याला

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✨🌀♾️♾️♾️♾️
*फेरीवाला*

आला आला फेरीवाला
आला फेरीवाला
चला चला रे सवंगड्यांनो
खेळणी घेऊ चला

सुंदर सुंदर खेळणी पाहून
मन हे झाले बावरे
हे घेऊ का ते घेऊ
चंचल मन ना सावरे

मोटरगाड्या,पुंगी,डमरू
उड्या मारणारा माकड
फेरीवाल्यासंगे आमची
जमली सुंदर सांगड

सोनु,मोनु,चिंटू,पिंटू
सर्वांनी घेतली खेळणी
नाचत नाचत खेळू लागले
धमाल केली अंगणी

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✨🌀♾️♾️♾️♾️
*फेरीवाला*

आला आला तो फेरीवाला
रंगीबेरंगी फुगे घेऊन आला
सारी मुले झाली त्याच्याभोवती
गोळा,सगळे फुगे तो विकून गेला

आला आला पुन्हा फेरीवाला
चाॅकलेट,बिस्किटे घेऊन आला
आवडता खाऊ साऱ्या मुलांचा
सगळ्या मुलांनी पटकन घेतला

फेरीवाला आमच्या दारात आला
विविध खेळणी आज घेऊन आला
पिंटू, मिनी,राणी,राजूने खरेदी केली
खेळणी घेताच सर्वांना आनंद झाला

खेळण्याच्या नादात शाळेत जाईना
कमालच केली आज फेरीवाल्यान
सारे सवंगडी धावत त्याच्याकडे येत
भूलली मुले सारी त्याच्या गोड बोलण्यान

अनवाणी फिरायचा फेरीवाला
पोटासाठी तो रोज फेरी मारायचा
आपण कष्ट करून दिवसभर
कुटुंबाला तो सुखात ठेवायचा

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✨🌀♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे