ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
शब्दांना जेव्हा जाग येते
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी, जुन्नर, पुणे

0
5
9
6
9
7
शब्दांना जेव्हा जाग येते
शब्दांना जेव्हा जाग येते
अंतरातील कोलाहल शमतो
घेऊन लेखणी हाती मग
मी साहित्य प्रांती रमतो
शब्द देतात आव्हान
रोजच मला नवे नवे
विचार वैभवाला माझ्या
आणखी तरी काय हवे
शब्दांना मिळते साथ
सूर आणि लयीची
बहरू लागतात पाने
माझ्या कवितेच्या वहीची
यमक,रूपक,अलंकारांनी
सजतात वहीची पाने
शब्दांना अनोखी चाल
जुळते सुरेल गाणे
या कवितेच्या वहीचे
आयुष्यभर करीन जतन
मज अंतरीच्या शब्दांचे
होईल नित्य सिंचन
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे
========
0
5
9
6
9
7



