Breaking
ई-पेपरकविताकोकणमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

सांज ही श्रावणी…

कविता

0 4 8 2 9 3

सांज ही श्रावणी…

सांज ही श्रावणी
नभी इंद्रधनुष्य
सखे तुझ्या येण्यानी
मोहरलेले आयुष्य..

नभात मेघ दाटले
सरींचा तो लपंडाव
धरेस भेटण्यासाठी
तृप्तेचा दिसे भाव..

सांज हि श्रावणी
माळरानी नाचे मोर
श्रावणसरी बरसता
का दाटे मनी काहूर?

सांज हि बोलकी
मज साद का घालती
गर्द शालू नेसून
सारेच तीला भुलती..

मोहरलेला आसमंत
सृजनाचा आविष्कार
येता ही सांज जीवनी
दिसे सृष्टीचा साक्षात्कार..

प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव-रायगड.
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे