Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरगुन्हेगारीनागपूरविदर्भ

LIC चा गंभीर हलगर्जीपणा; मुदतपूर्तीची लाखो रुपयांची रक्कम दुसऱ्याच खात्यात जमा

नागपूर/ हिंगणा प्रतिनिधी गजानन ढाकुलकर

0 5 1 6 4 1

LIC चा गंभीर हलगर्जीपणा; मुदतपूर्तीची लाखो रुपयांची रक्कम दुसऱ्याच खात्यात जमा

नागपूर/ हिंगणा
प्रतिनिधी गजानन ढाकुलकर

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर : भारतीय जीवन बीमा निगम (LIC) च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. वानाडोंगरी, हिंगणा रोड येथील भूषण नामदेवराव आगरकर यांच्या मुदतपूर्ती झालेल्या पॉलिसीची लाखो रुपयांची रक्कम चुकीने दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यावर वर्ग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगरकर यांची पॉलिसी क्रमांक ९७७३६३६६४ नोव्हेंबर २०२५ मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर LIC अधिकाऱ्यांनी दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी मोबाईल क्रमांक ९९६०१३४०८८ वरून संपर्क साधून बँक तपशील मागविले होते. आगरकर यांनी बँक ऑफ इंडिया, हिंगणा शाखेचा पासबुक फोटो व खाते क्रमांक पाठवूनही त्यांच्या खात्यात रक्कम जमा न होता ती चुकीने दुसऱ्या खात्यावर वर्ग झाल्याचे समोर आले.

या प्रकरणी आगरकर यांनी LIC शाखा क्रमांक ९९३, LIC चौक, नागपूर येथे लेखी तक्रार दिली असून, तरीही आठवडाभर उलटूनही रक्कम परत मिळालेली नाही. दरम्यान नागपूर कार्यालयातील श्री. उमाकांत यांच्याशी संपर्क साधला असता, “असे प्रकार होतच असतात, पैसे परत मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे,” असे सांगितल्याचे आगरकर यांनी सांगितले.

या गंभीर प्रकरणाबाबत आता LIC चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, केंद्रीय कार्यालय मुंबई यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्यात आली असून, चुकीने वर्ग झालेली रक्कम तात्काळ परत मिळावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे LIC च्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 4 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे