Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनरायगड

रायगड जिल्हास्तरीय नेतृत्वगुण विकास शिबिराचे उत्साहात उद्घाटन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 6 7 9 7 3

रायगड जिल्हास्तरीय नेतृत्वगुण विकास शिबिराचे उत्साहात उद्घाटन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग, (दि 26 नोव्हेंबर): मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व जे. एस. एम. महाविद्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय नेतृत्वगुण विकास शिबिराचा उदघाटन समारंभ गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी जनता शिक्षण मंडळाच्या जे. एस. एम. महाविद्यालयात येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या शिबिराच्या उद्घाटन समारंभाला जे. एस. एम. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व जनता शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अनिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील होत्या. तसेच महाविद्यालयाचे उपप्रचार्य व रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. प्रविण गायकवाड, राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत, प्रा. सचिन भोस्तेकर तसेच रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून आलेले एन. एस. एस. स्वयंसेवक उपस्थिती होते.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. डॉ. गौतम पाटील यांनी या रायगड जिल्हास्तरीय नेतृत्वगुण विकास शिबिरास हार्दिक शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजना रायगड जिल्हा समन्वयक डॉ. प्रविण गायकवाड यांनी शिबिर आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, संघभावना, स्वयंशिस्त, निर्णयक्षमता आणि सामाजिक जाणीव विकसित करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. अशा शिबिरांमधून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाची आणि सामाजिक परिवर्तनात सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. अनिल पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना सांगितले कि विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान संपादन न करता समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून सक्षम नेतृत्व विकसित करावे, तसेच युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि सामाजिक संवेदनशीलता जोपासून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले कि, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी व्यासपीठ आहे. नेतृत्वगुण विकास शिबिरामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नेतृत्वाचे धडे मिळतील आणि भविष्यात जबाबदार नागरिक म्हणून घडण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी आठवले यांनी केले.

दि. २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या शिबिरामध्ये रायगड जिल्ह्यातील झोन १ व झोन २ मधील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वक्षमता, सामाजिक जाणीव, राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रनिर्मितीविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 9 7 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे