शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील काव्यरचना
मुख्य संपादक राहुल पाटील
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*
*☄विषय : क्षणभंगूर☄*
*🍂शनिवार : १४ / जून /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*क्षणभंगूर*
आतुरलेल्या धरेस बिलगाया
पावसाच्या सरी सरसर आल्या
क्षणिक सहवास लाभला तरी
बिलगून तिथंच विलीन झाल्या
सप्तरंगी इंद्रधनुष्य नभी ऊभा
आकाशात आकर्षण वाढवून
क्षणभंगूर अस्तित्व असले तरी
घेत असतो लक्ष सर्वांचे वेधून
कोकीळ कुहुकुहू सुमधुर गाता
क्षणिक कानावर लकेर आलेली
तृप्त करते कर्णमधुर आवाजाने
ऐकण्याची जणू जादूच केलेली
अंधारात चाचपडत भरकटता
काजव्याचे चमकने वाटते बरे
क्षणभंगुर उजेड असला तरीही
दिशादर्शक ठरे तेंव्हा तोच खरे
पानावर पडलेला एक दवबिंदू
वाढवितो शोभा त्याच पर्णाची
ढगातून पडलेला पावसाचा थेंब
तृष्णा भागवितो त्या चातकाची
सारं काही क्षणभंगुर असतांना
किती सुखावतो तो निसर्ग पण
जिवनाचा आनंद घ्यावा पुरेपूर
क्षणभंगूर जीवन आहे तरीपण
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगुर*
जीवन आहे आपले क्षणभंगुर
जीवन सर्वांनी भरभरून जगावे
नको रुसवे फुगवे कोणाबरोबर
सर्वांना आपण आपलेच मानावे…
जीवनातील सारेच क्षण आपण
घड्याळासमावेत जगत असतो
वेळेच्या साम्राज्यात सारेचजण
सुखदुःखाचे क्षण मात्र वेचतो…
जीवन आहे हा अथांग सागर
यात पोहायला जमणार नाही
पण बहरत जाईल फुलासारखे
इथे उणे धुणे मात्र नको काही…
बघतो स्वप्ने विश्वासाने आपण
बघता बघता खेळ इथे रंगतो
स्वप्नांचे इमले चढवता चढवता
जीव मात्र मेटाकोटीस येतो….
समाजाचे मूल्य सारेच जाणूया
जीवनी माणुसकीनेच वागूया
नातेसंबंधांची जपणूक करूया
मैत्रीचे नाते जुळवत राहूया…
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगूर*
क्षणभंगुर आयुष्य संपले,
कधीच कळणार नाही.
येईल अशी वेळ दिवस,
उद्याचाही दिसणार नाही.
काल आलो होतो जन्माला,
वर्तमानात जगत आहे.
काळ नेईल केव्हा कुणा,
कधी सांगता येणार नाही.
जन्मास येऊन जीवन
मर्जीनेच तुझ्या जगला.
जाताना काय देऊन जाईन,
ते सांगशील का तू मला?
कसला गर्व तुला आला,
सांगशील काय मला?
श्रीमंत-धनिक झालास,
पण मरण नसे हाताला.
बघ, थोड्याशा श्रद्धांजलीत
दोन शब्द चांगले येतील,
समाजासाठी काहीतरी कर
तेवढच आठवणीत राहील.
*डॉ. बालाजी राजुरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगूर*
कुठे कोण जगणार शाश्वत येथे,
क्षणभंगूर,अमर जीवनाची गाथा येथे..!
आगीतून उठून पडला फुफाट्यात जरी,
कुठे फुफाट्याला गारव्याचा भास येथे..!
नको उगा श्रावणाचे गाऊ गोडवे तू,
ग्रीष्मातही मान्सूनचे श्रावण गीत येथे..!
का जाळावे चिंतेने आजन्म मानवाला,
चिंतेचीही चिता जाळणारे महामानव येथे..!
कारखानदाराला सदा चिंता क्षणभंगूर मालाची,
चिरकाल टिकणारा”नोकिया” मेला येथे..!
बळीराजाला जाळते कुठूनही येऊनी चिंता,
चिंतेची चिता आसमानी,घेई शांत झोप येथे..!
कशाला क्षणभंगूर जीवनाचे गीत गातो मंगेशा,
पसायदान जीवनाचे मागणारे गेले होऊनी येथे..!
*श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*क्षणभंगुर*
क्षणभंगुर असे जरी
जीवन हे आहे सुंदर
जन्म आणि मृत्यू मध्ये
असे एका श्वासाचे अंतर
सुखदुःखाच्या धाग्यांनी
वस्त्र असे विणलेले
तीन अंकी नाटकातच
जीवन असते भरलेले
बाल्य,तारुण्य, वृध्दत्व
अंक असती जीवनाचे
त्यात असे जाळे फसवे
मोह,माया नी षड्रिपुंचे
गुंतून जाशी मोहमायेत
हे माझे ते माझे म्हणशी
अतोनात हाव करूनी
पैसा अडका जमविशी
श्वास संपता जावे लागे
क्षणाचा नसे भरवसा
येशी उघडा जाशी उघडा
जाणशील का रे माणसा?
आनंदाने हसत जगावे
त्याग करूनी षड्रिपूंचा
निसर्गाला गुरु मानूनी
मंत्र जप तू त्यागाचा
निस्वार्थी तू सदा रहावे
वाण लुटूनी रे हर्षाचे
आनंदाचे बीज रुजविता
तरु फुलवी तू सौख्याचे
इथला असशी तू प्रवासी
नाही काही हक्क तुला
जन्म दिला ज्याने तुजला
जाणून घे जगन्नियंत्याला
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगुर*
काल आज नाही
आज उद्या नाही
अस्थिर सारे इथे
हाव जिथे तिथे
क्षणभंगुर हे जीवन
घडीभराचे आहे
कोण जाणिले काही
उद्याचा चंद्र पाहे
काय दडले नियतीच्या मनात
कुणा ध्यानी मनी न आले
विमान स्वारी करण्या सारे
आनंदाने प्रवासास निघाले
कुणी सेल्फी कुणी मॅसेज
टेक ऑफ सांगितले
विमान गेले ऊंच आणि
शहर, घरे छोटी झाले
नजर लागावी आनंदाला
विमानच बिघडून बसले
काही कळण्या आधीच
आगीचे डोंब उसळले
मुले बाळे,बायका लेकरे
जीव मुठीत घेऊन होते
तसे आगीचे लोळ
चोहीकडे पसरत होते
क्षणात सगळे संपले
नको गर्व मानवा कशाचा
नको काबाड ओझे
नसे भरोसा या क्षणभंगुर जीवनाचा
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगुर*
देह नश्वर…
आयुष्य क्षणभंगुर आहे
कीर्ती गड्या अजरामर ..
जगणे आपल्याच हाती
असे जगू की, जगणेच
होईल अमर कीर्ती…
प्रेम ही, चिरंतन भावना
नाही ती क्षणभंगुर …
जसे कृष्ण राधेचे प्रेम…
जिवंत आहे मिरेच्या भक्तीत..
सच्या प्रेमीयुगुलात ही, जिवंत आहे….
प्रेम असो केव्हा कुठेही ,
गाय अन वासरातही,
पक्षी अन पिल्लातही,
प्रेमाचा हा निर्झर ,अखंड
अविरत… वाही..
जन्म मृत्यू हे अंतिम सत्य
आला तो जाणारच आहे
पण आयुष्य जगताना
जगु आनंदी -आनंदे करू
वर्षाव प्रेमाचा….
जगणे असावे चंदनापरी….
प्रेमाचा परिमळ पसरावा
चहुदिशी व्हावा कीर्तीचा
दरवळ … निसंकोच… निर्मळ…निरंतर…
*सौ सुरेखा कोरे, नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगुर*
आगीची ज्वाळा पसरली
आणि क्षणात सगळ संपलं
विमान दुर्घटनेत अनेकांनी
अपूल अनमोल जीवन गमावलं
डोळ्यासमोर मृत्यू बघतांना
काय हाल झाले असतील त्यांचे
किती घाबरली, रडली असतील
घरी त्यांच्या कोसळले डोंगर दु:खाचे
आनंदाचे आयुष्य नियतीने
बघा क्षणात कसे बदलले
राख केली निरागस जीवांची
फक्त आता आठवणीत ते राहिले
कुणालाच माहीत नाही कधी
कुठे आपला शेवट आहे
प्रेमाने, आपुलकीने वागा
काय या जीवनात ठेवले आहे
द्वेश, मत्सर, नका करु राग
ठेवा इतरांप्रती निर्मळ मन
हे आयुष्य क्षणभंगुर आहे
जगून घ्या आनंदाने प्रत्येक क्षण
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगुर*
क्षणभंगुर आयुष्य जगू ,आता आनंदाने।
भरोसाच नेईल प्राण, वैकुंठी विमानाने।।
आठवावे जीवनात ,संत तुकाराम बीज।
अंगाईने इंद्रायणी,कुशीत घेईल निज।।
अभंगी तुळशी हार,दिले दर्शन विठ्ठलाने//१//
धर्मात वेगळे काय ,माणूस हिच रे जात।
हिंदू मुस्लिम म्हणूनी,नका मानू जातीपात।।
स्रुष्टिचा एक विधाता,वंदावे दोन्ही कराने//२//
वागणे बरे नाही हे , विसरून मायबाप।
माणूसकीला दंश करी, विषारी तिथे साप।।
हातात हात घेऊनी,चला नांदुया सुखाने//३//
सद्भावना जपूनी चालू, सन्मार्गे शिखरे।
मानवतेची ह्रदयी बांधू,भव्यदिव्य मंदिरे।।
जीवन सार्थक होई ,सारे शुद्ध विचाराने//४//
*गोवर्धन तेलंग,पांढरकवडा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगुर*
क्षणभंगुर स्वप्नं, क्षणभंगुर हास्य,
क्षणात बदलतं जीवनाचं भाष्य।
सखा सोबत असतो, अन् क्षणात जातो दूर,
उरतो तोच एक फोटो, आणि आठवणींचा पूर।
क्षणभंगुर हसरा क्षण, अलगद उधळून जातो,
जणू पावसातला थेंब, मिटता मिटता हरवतो।
क्षणभंगुर हे क्षण, पण आठवणी अमर राहतात,
हसणं, खेळणं, भांडणं, पुन्हा जोडू नाती पाहतात।
कधी शब्दातून उधळे हास्य, कधी अर्थातून येते आस,
क्षणभंगुर त्या चर्चा, पण कायम मनाशी खास।
क्षणभंगुर वेळ, पण त्यातच दडलेले निर्णयांचे वळण,
क्षणभंगुर तू, मी, प्रत्येक स्पर्श, प्रत्येक क्षण।
कधीतरी हेच क्षण, अश्रूंमधून पुन्हा फुलतात,
कधीतरी त्या हसण्यात, दुरावलेलेही आपले होतात।
क्षणभंगुर असो का आयुष्य, त्यातही अमरत्व सापडतं,
पण प्रेम, नाती, आठवणी… हेच खरं ‘शाश्वत’ ठरतं।
*सौ.मोनाली शिंदाडे*
*कर्वेनगर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगूर*
क्षणभंगूर आहे
मानव प्राण्याचा देह,
कर सेवार्थ, कर्म
नसता होईल, दाह.
आत्ताचा क्षण तो, आपला
पुन्हा कोण जाणे
कोणाचा?
काळ वेळ काय तें, ठरविल
नाही भरोसा घडीचा.
हरघडी करावे,तुम्ही
कुशल कर्म,
परोपकाराणे उमजावे
जीवनाचे मर्म.
आपला समजावा
मुखी घातलेला घास,
जिवंतपणाचे लक्षण आहे
आणि घेतलेला श्वास.
जन्मार्थ पाहिले जग
आता सेवार्थ जगावे,
मरावे परि,सज्जन हो
कीर्तिरूपी उरावे.
*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगूर*
प्राजक्त फुलला माझ्या दारी
मंद सुवास भरला या मनी..
शुभ्र सडा वेचून घेत अलगत
ओंजळ झाली क्षणभंगूर धनी..!
बघून प्राजक्तास विचार आला
नाजूक फुलांचेही का ओझे तुला..
तत्पर असतो तू रिक्त होण्यास
या फुलांचा होतोय किती मोह मला..!
फुलेही हसलीत माझ्याच वरती
या सुगंधाचा जरा आनंद तर घे..
आलेल्या क्षणात जगावे भरभरून
संदेश आमचा स्वार्थी जगास दे..!
कोमेजण्या आधी दरवळ देऊन जातो
तुझेच खतपाणी तुला अर्पण करण्या येतो..
मानव मात्र किती हपापलेला असतो
निसर्गासही किती ओरबाडून घेतो..!
माझे माझे करत विसरतो नियम जन्माचा
खाली हाथ आलो ,खाली हात जण्याचा..
एका श्वासावरही नाही त्याचा अधिकार
क्षणभंगूर जीवनाचा त्याला गर्वच फार..!
मृत्यूची आठवण सदैव असावी या मनीं
मिळाले आयुष्य बना सत्कर्माचे धनी
कर्माचे फळं आपणच तर चाखणार..
आपल्या कर्माचे आपणच राखणदार
आपल्या कर्माचे आपणच राखणदार..!
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



