Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजीनगरनागपूरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

“सुवर्ण पदकाची सुखांतिका, ते उदरनिर्वाहाची शोकांतिका..”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय 'हायकू काव्य' स्पर्धेचे परीक्षण

0 6 2 9 2 1

“सुवर्ण पदकाची सुखांतिका, ते उदरनिर्वाहाची शोकांतिका..”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेचे परीक्षण

कधीकाळी राजे राजवाड्यांच्या जमान्यात कोणत्याही कलेला राजाश्रय होता. कलेची खरी कदर केली जायची.. ज्याची त्याची पारख करून योग्य मानसन्मानासह त्याच्या उदरनिर्वाहाची सुद्धा सोय लावली जायची. जेणेकरून तो कलावंत आपल्या कलेवर अधिक मेहनत घेऊ शकत असे. कलावंत म्हणजे त्या त्या प्रांताची ओळख होती. अनेक प्रकारचे खेळ आणि खेळाडूसुद्धा याच प्रकारात मोडतात. खेळाच्या माध्यमातून प्रचंड अंगमेहनत आणि बुद्धीचातुर्याच्या बळावर. जगभर राष्ट्राचा नाव लौकिक करणारे अनेक खेळाडू आहेत. अशा खेळाडूंमुळे कोणत्याही राष्ट्राला जगभरात एक विशिष्ट ओळख प्राप्त होते. उदाहरणार्थ झारखंड या छोट्याशा राज्यातून उदयास आलेल्या महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या माध्यमातून भारताला जागतिक पटलावर एक विशिष्ट ओळख निर्माण करून दिली. याच झारखंड राज्यातील थ्रो बाॅल खेळाडू अमरदिप कुमारने भारताला चार सुवर्ण पदके मिळवून दिली आहेत. मात्र आज हाच खेळाडू उदरनिर्वाहासाठी भाजी विक्रेता बनला आहे.

जागतिक पातळीवर खेळल्या जाणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत जगभरातील छोट्या छोट्या देशातील अनेक गुणी खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय खेळातील नैपुण्य दाखवत आपापल्या देशाला प्रतिष्ठा मिळवून देतात. भारतातसुद्धा असे अनेक देशी खेळ आहेत. मात्र ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत खूपच नगण्य खेळाडू चमकतात. क्रिकेटचा अपवाद वगळता इतर खेळात मात्र लोकप्रियतेचा अभाव, नगण्य ग्लॅमर, शासकीय उदासीनता यामुळे विश्व पातळीवर सुवर्णपदक विजेते खेळाडूसुद्धा आज रोजीरोटीसाठी संघर्ष करताना दिसतात. याहून मोठी शोकांतिका ती काय असणार? या खेळाडूंची अशी अवस्था होत असेल तर देशी खेळाकडे वळण्याची कुणीच हिंमत करणार नाही.

किंबहुना राष्ट्रीय ओळख असलेले खेळ कालबाह्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खेळ केवळ मनोरंजन नसून ते त्या त्या राष्ट्राची संस्कृती दर्शवतात. त्याप्रती रूची असणे. त्याची अस्मिता जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याकरिता शासनाकडून अशा खेळातील तरबेज खेळाडूकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय तालुका, जिल्हापातळीवर अशा खेळासाठी विशेष साधनसुविधा प्रशिक्षण पुरवणेसुद्धा गरजेचे आहे. तरच नवी पिढी या खेळात रस दाखवेल प्राविण्य सिद्ध करून देशाला नावलौकिक मिळवून देईल.

काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेले चित्र याच संदर्भाने अतिशय बोलके आहे. चित्रात दोन दृश्य दिसतात एका बाजूला एक युवा खेळाडू भारतीय क्रिडा पोशाखात असून त्याच्या गळ्यात सुवर्ण पदक दिसत आहे. आपण आपल्या राष्ट्राला बहुमूल्य सन्मान मिळवून दिल्याचा सार्थ अभिमान त्याच्या चेहर्‍यावर दिसत आहे. मात्र दुसर्‍या बाजूला हाच खेळाडू भाजी विकताना दिसत आहे. याचा अर्थ त्याला आज जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. एका दर्जेदार खेळाडूची अशी अवस्था असेल तर शासकीय व्यवस्था इतकी आंधळी का? हाच प्रश्न पडतो.

खेळात सुवर्ण पदापर्यंत झेप घेणे सामान्य गोष्ट नाही. प्रचंड चिकाटी, जिद्द, मेहनत, आणि सेकंदा सेकंदाचे महत्त्व डोक्यात ठेवावे लागते. एकच सेकंदही पदापासून दूर घेऊन जाऊ शकतो. अशा वेळी त्या खेळाडूंची मानसिकता किती तयारीची असावी लागते याची कल्पना येते. आणि इतकी गुणवत्ता असलेल्या खेळाडूंला अर्थिक स्थैर्य मिळू शकत नसेल तर याहून मोठे दुर्दैव ते काय असणार? अशी अनेक उदाहरणे देशात आहेत. आज विशिष्ट ग्लॅमर आणि शासकीय रूचीमुळे क्रिकेटपटू अब्जाधीश होत आहेत. आणि दुसरीकडे देशी खेळ खेळणारे खेळाडू सुवर्ण पदक विजेते असूनही त्यांना पोटासाठी रस्त्यावर भाजीपाला विकावा लागणे.. म्हणजे शासकीय उदासीनतेचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे.

अशा चित्रावरून खूपच परिणाम कारक संदेश देणारे हायकू लेखन अपेक्षित आहे. अशा चित्रांची योग्य ती माहिती उपलब्ध करून घेणे आणि त्या अनुषंगाने लेखन करणे आवश्यक असते. जे दिसते त्या पलिकडे काहीतरी असते ते व्यक्त करता आले पाहिजे. खूपच मार्मिक भाष्य करता येण्यासारखा चित्र विषय आहे. चित्राचा योग्य अभ्यास केला तरच त्याचे प्रतिबिंब हायकू लेखनात पडू शकते. सर्वांच्या लेखणीला शुभेच्छा… आणि मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनःपूर्वक आभार.!.

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 2 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे