0
4
8
2
8
6
साहित्य सहवास
साहित्य सहवास
ज्ञानमय प्रवास
शब्दरत्नांची कोमलता
नवनिर्मितीचा ध्यास
शब्द शब्दांची माळ गुंफली
दर्पणात पाहता साहित्याचा
स्पंदन होते शब्दसंग्रहाचे
लेखन चिंतन आत्म्याचा
मनाच्या अंगणात फुलती
ओठावरून लेखणीत येते
शब्द अर्थ प्राप्त होतो
मनातील भावना व्यक्त होते
परंपरा सुसंस्कृतीत राहुनी
शब्दांची सांगड घालून
साहित्य सहवासाने सुजाण
सृजनशीलता मनात बाळगून
कथा कादंबरी पोवाड्यातून
वाढवूया साहित्य सहवास
आंतरिक भावनेतील शब्दाने
भाषा संस्कार ज्ञानमय प्रवास
सौ.कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
=========
0
4
8
2
8
6



