0
4
8
2
9
4
अवकाळी
पाऊस मुसळधार
संगे सोसाट्याचा वारा
क्षर्णाधात कोसळती
टपटप मोठया गारा.
विजांचा गडगडाट
चुके काळजाचा ठोका
गर्जनेच्या आवाजाने
हाले सुगरण खोपा.
आले आभाळ भरून
काळेकुट्ट सारे झाले
वाट घराची धरून
जनावरे ते पळाले.
अवकाळी पावसाने
सारा हिशोबच केला
उन्हाळ्यात भुईमुग
सडुनिया सारा गेला.
काळ्याभोर वावराला
आले तळयाचे स्वरुप
चिंतातुर बळीराजा
कसा झाला गुपचुप.
दिपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
=========
0
4
8
2
9
4



