उद्या राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उदगीरात
उदगीर येथील बुद्ध विहार उद्घाटन व महिलांच्या आनंद मेळाव्याला उपस्थित
उद्या राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उदगीरात
उदगीर येथील बुद्ध विहार उद्घाटन व महिलांच्या आनंद मेळाव्याला उपस्थित
जिल्हा प्रतिनिधी लातूर/उदगीर
लातूर: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उद्या लातूर जिल्हातील उदगीर दौऱ्यावर येत आहेत. ते उदगीर येथील बुद्ध विहार उद्घाटन व महिलांच्या आनंद मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा ही पार पडणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लभार्थी महिलांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राज्यातील पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उदगीरमध्ये येणार आहेत.



