0
4
8
2
9
0
गुरू
गुरूवर्य तू शिल्पकार समाजाचा
समाजाचाच तुला रे आधार
देवूनी दिशा बालगोपालांना
करी तयांचे स्वप्न तू साकार…..
जीवनास त्यांच्या साकारतो
शाब्दिक आधार तयांना देतो
कोणतेही शैक्षणिक कार्य असो मुलांचे
शिक्षक मदतीला मुलांच्या येतो…
स्वप्नांना मुलांच्या खतपाणी घालतो
योग्य दिशा बालकास देतो
शिष्यास नावारूपाला आणतो
आनंदाने स्वतःच भारावून जातो..
आल्या अनेक,अनंत अडचणी
गुरुवर्य त्यातून वाट काढी
वसा हा तयांचा बालके चालविते
सर्वांच्या कौतुकास पात्र ठरती..
आकार देवून मातीसम गोळ्याला
ज्ञानी बनवले गुरूने तयाला
आजच्या या गुरुपौर्णिमा दिनी
सन्मानाने गौरविले आपल्याला…
कार्य गुरूवर्यांचे असे महान
देतसे सर्वांना सर्वोत्तम ज्ञान
कर्माचे ठेवूनी नेहमीच भान
भावी नागरिक घडवी छान…..
वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जिल्हा पुणे
==========
0
4
8
2
9
0



