मराठीचे शिलेदार समूहाप्रती ‘कृतज्ञतेची शब्दसुमने’; प्रतिमा नंदेश्वर
मनोगतीय आभार एक चिंतन

मराठीचे शिलेदार समूहाप्रती ‘कृतज्ञतेची शब्दसुमने’; प्रतिमा नंदेश्वर
मनोगतीय आभार एक चिंतन
शब्द शब्द गुंफले मी चारोळीत
आशय होता माझ्या रसाळ वाणीत
परीक्षकांनी केला माझ्या शब्दांचा सन्मान
शिलेदार समूहाच्या सदैव मी ऋणाईत
सर्वप्रथम माझ्या ‘लपवू नकोस’या विषयावरील रचनेला सर्वोत्कृष्ट म्हणून निवड केली. मला अत्यानंद झाला. हर्षाने मी चिंब भिजले. या महिन्यात सतत माझ्या रचना सर्वोत्कृष्ट ठरत आहेत. मज मन आनंदाने तृप्त झाले आपण मला दिलेला सन्मान बघून मी भारावले. समूहाचे कल्पवृक्ष, आधारवड, सर्वेसर्वा आ. राहुल सर प्रशासक मुख्य परीक्षक आ सविताताई, आ. वैशालीताई व सर्व प्रशासकीय टीमचे मनस्वी आभार.
‘मराठीचू शिलेदार’ समूह म्हणजे शब्दांचा खजिना, ज्ञानाचा सागर, शब्दवैभवी नवोदित साहित्यिकांच आपले विचार, भावभावना व्यक्त करण्याच हक्काच व्यासपीठ. समूहाचे आधारवड,सर्वेसर्वा, कल्पवृक्ष, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मुख्य प्रशासक आ राहुल सर यांनी रोज दिलेले नवनवीन बुद्धीला चालना देणारे सुंदर विषय आणि आ. सविताताई, आ. वैशालीताई, आ. स्वातीताई, आ. वृंदाताई, आ. विष्णू दादा यांचे शब्दांचा अर्थ उलगडत केलेले उत्कृष्ट परिक्षणीय लेखण आम्हास प्रेरणादायी ठरते. मुख्य प्रशासक, प्रशासक व सर्व सहप्रशासक यांचे समूहाचे शिस्तबद्ध काम व सर्वाचे परिश्रम कौतुकास्पद.
“मराठीचे शिलेदार” समूहात रोज लेखन केल्यामुळे विचाराची प्रगल्भता वाढून माझ्या कवितेची क्रांती इथेच घडली आणी माझी नवी ओळख निर्माण झाली. त्याआधी माझे कवितेचे ज्ञान शून्य होते. आता मात्र माझे तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. म्हणूनच आ राहुल सरांनी निर्माण केलेल्या शिलेदार समूहाचा मला खूप खूप अभिमान वाटतो आ. राहुल सर त्याचा सहकारी वर्ग यांच्या अथक परिश्रमाने शिलेदार काव्यविश्व दिवसागणिक फुलत आहे.शब्दप्रभूंच्या दर्जेदार साहित्याने बहरत आहे.. राहुल सरांच्या मराठी भाषेच्या संरक्षण, संवर्धन या पवित्र कार्य कुशलतेला माझे त्रिवार वंदन.
माझ्या शब्दांचा सन्मान करून मला गौरवण्यात आले त्याबद्दल मुख्य प्रशासक, प्रशासक, मुख्य सहप्रशासक व सर्व प्रशासकीय टीमचे मनस्वी आभार. माझ्यावर समूहातील प्रिय दादा ताईंनी स्नेहमय अभिनंदनाचा वर्षाव केला सर्वांचे आभार व धन्यवाद
कवयित्री सौ. प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह



