0
4
8
2
9
7
निसर्ग चित्र
भगव्या रंगाची
परिधान करून वस्त्रे
सजतं आकाश सांजवेळी
निसर्गाची अदभूत ॶन्
चमत्कारिक कलाकृती
होतो मी थक्क
पाहुनी जगावेगळी
हळूहळू जातो रवी
निशेच्या कवेत
जाणवतं परिवर्तन
वाहणाऱ्या हवेत
पक्षी घरट्यात परती
गुरेढोरे ही घरी जाती
दाखवी संध्या अपुला प्रभाव
ताऱ्यांचा आकाशी जमाव
थकलेले सारे जीव
क्षुधा आपली भागवती
दिवसभराच्या कष्टाने चूर
निद्रेच्या अधीन जाती
नक्षत्र ताऱ्यांनी भरूनी
आकाशी चंद्राचे एकछत्र
आसमंत निरव सारा
रातकीडे आवरती फक्त
पुन्हा उषा आगमनास
राही सदैव सज्ज
रवी उगवतो जोमाने
चालत राहील निसर्गचक्र
पंकज रामकृष्ण चारथळ
बजरंग नगर कोराडी रोड नागपूर
======
0
4
8
2
9
7



