आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
तहान
स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, जि.पुणे

0
5
4
7
2
3
तहान
कासावीस झाला जीव
अति लागली तहान
तुडवीत रान सारे
मृग झाला बेभान..
पोकळ आभास सारा
नभ कोरडेच आले..
त्याच्याकडे पाहुनिया
पाणी डोळ्यात दाटले..
पाण्यासाठी दाही दिशा
सुरू झाली वणवण..
आग ओकू लागले
भवती तापलेले रण..
तृषार्त चातकाची
वाट पाहणं संपेना..
सुकलेल्या अधरात
स्वर आता फुटेना..
येरे येरे पावसा
चिंब होऊ दे रान..
तृप्त करून धरणीला
तिची भागव तहान..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, जि.पुणे
0
5
4
7
2
3



