Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

‘ज्ञानदीप ते जीवनदीप’ विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

वसुधा नाईक, पुणे

0 6 4 5 1 3

‘ज्ञानदीप ते जीवनदीप’ विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

वसुधा नाईक, पुणे

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे, (दि १६) : शहरातील वंडर स्कूल, कात्रज इथे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जीवन प्रवास उलगडत वसुधा वैभव नाईक यांनी वंडर स्कूल या शाळेतील संस्थापक तथा अध्यक्ष श्री. कदम सर, लायन्स क्लब उपाध्यक्ष श्री.मुजुमले सर, सर्व शिक्षक, लायन्स क्लब पदाधिकारी यांची मने जिंकली.

वसुधा नाईक यांच्या जीवन प्रवासाचा आढावा प्रश्न उत्तर स्वरूपात घेताना..

1)तुम्ही उपक्रमशील शिक्षक होण्यासाठी काय केले?
2) तुम्हाला चारोळी, कविता करण्याचा छंद कधी,कसा लागला?
3) आत्तापर्यंतचा आपला प्रवास थोडक्यात कथन करावा…
अशा प्रश्नोत्तरातून वसुधा नाईक यांनी आपल्या जीवनाचा आढावा सांगितला.

उपक्रमशील शिक्षक होण्यासाठी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम प्रकल्प यांची उत्कृष्ट मालिका राबवली आणि पूर्ण माहिती महाराष्ट्रातील चार प्रातिनिधिक उपक्रमशील शिक्षक या पुस्तकांमध्ये समाविष्ट केलेली आहे.

2015- 16 मध्ये ज्यावेळी व्हाट्सअप आले त्यावेळेस पासून मी चारोळी कविता करू लागले. चारोळी आणि कविता करण्यामागे मराठीचे शिलेदारचे संस्थापक मा.राहुल पाटील आणि शैक्षणिक समूहाचे देवराज चव्हाण सर
यांचा खूप मोठा वाटा आहे.

जस जशा माझ्या चारोळी कविता लोकांना आवडू लागल्या तसतसा माझ्या कवितासंग्रह येऊ लागला आणि आज माझ्या स्वतःचे सहावे पुस्तक येत आहे.असे सांगितले. पहिले पुस्तक काढण्यामागे मा.राहुल सर यांचा मोठा प्रेरणेचा स्त्रोत माझ्याबरोबर होता असेही त्यांनी सांगितले.

स्वतःचाच प्रवास स्वतःच्या तोंडाने सांगण्यापेक्षा आज महाराष्ट्रातील बरेच साहित्यिक बोलत आहेत. त्याचे प्रतिबिंब म्हणजे ‘माणूसकीची सावली ‘ एक निस्वार्थ आधार हे पुस्तक माझ्या साठी अनेक महाराष्ट्रातील लोकांनी गौरवलेले शब्द पुस्तक बंद करण्यात आले आहे. त्याचे संपादक आहेत योगेश हरणे आणि गौरव पुंडे आहेत. आपले काम बोलते. असेही सांगितले. माझ्याबरोबरच अजून चार निवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक होते. सर्वांचे मनोगत प्रश्न उत्तर स्वरूपात घेतले गेले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 4 5 1 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे