0
1
9
8
8
5
बोलके मन ॥
असावे सर्वांचे ।बोलके ते मन
आनंदी जीवन । मिळतसे ॥१
चांगले सत्कार्य । करतच जावे
मागे न पहावे । आतातरी ॥२
सुखकर क्षण । येवो जीवनात
करूया ती मात । दुःखावर ॥३
बोलके ते मन । करुया चिंतन
ठेवा सर्वजन । जीवनात ॥४
मनामध्ये ठेवा । स्नेहाची भावना
प्रसन्नता जना । भेटतसे ॥५
दिपककुमार सरदार
ता. लोणार जि. बुलढाणा
0
1
9
8
8
5