0
4
8
2
9
3
खंत
माझ्या प्रीतीचे पाखरू
का असे अबोल झाले
अचानक रुसण्याने
वाटे आभाळ फाटले ॥ १
पहा सुकला फुलोरा
गालातच हसणारा
भृंग उदास तो झाला
मधुबोल बोलणारा ॥२
रानातील सारी पाने
उदासली दिसभर
सैरभैर वाहणारे
वारे थांबली अखेर ॥ ३
मुक झाल्या वृक्षवेली
परिसर झाला शांत
कुणी कुणाला बोलेना
सारे बसले निवांत ॥ ४
कंठ पक्षाचे गाणारे
स्वर त्यांचे उदासले
थुईथुई नाचणारे
मोर बघा थबकले ॥ ५
दीपककुमार सरदार
जि बुलढाणा
0
4
8
2
9
3



