0
4
8
3
0
0
टिकेल का लोकशाही
बघा मंत्री आलेत घरोघरी
भाषणे खोटी आश्वासने
मंचावर बडाया कितीतरी
नेते, कार्यकर्ते पार्टी उधळने
बटेगे तो कटेगे,लाडली बहना
योजनेने दिले पाठबळ
शासन तिजोरी पैसा देना
उधळले खुर्ची ,सत्तेसाठी
मतदाराने हक्क बजविला
माणुस ओळखून मतदान दिनी
निकाल भलताच आश्चर्य किती
होत्याचे नव्हते झाले या दिनी
न भुतो न भविष्यातो निकाल
एकच पक्ष येतो सर्वीकडे
एक्झिट पोल येतो पूर्वीच
जिकडे तिकडे चौहिकडे
कसे होत्याचे नव्हते झाले
काय मतदार आ वाचून
निकाल दिनी पाहू लागले
मनात शंका झाले का स्कॅन
भलत्याचं गळ्यात पडली माळ
उधळला बघा पक्षाने गुलाल
संविधानाला नाही धक्का देणार
लोकशाही टिकेल का हा सवाल
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी,नागपूर
=========
0
4
8
3
0
0



