मूकनायक तर्फे गीतगायन स्पर्धा व काव्यस्पर्धेचे भव्य आयोजन लवकरच
नागपूर शहर प्रतिनिधी
मूकनायक तर्फे गीतगायन स्पर्धा व काव्यस्पर्धेचे भव्य आयोजन लवकरच
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर : (दि ६) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुद्धा मूकनायक इंडिया टी.व्ही. तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या, जयंतीनिमित्ताने गीतगायन स्पर्धा व काव्यस्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गीतगायन स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कारः 11 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 7 हजार तर तृत्तीय पुरस्कार 5 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तर काव्यस्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार- 5 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार- 3 हजार रुपये व तृतीय पुरस्कार- 2 हजार रूपये आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल श्रीफळ असे आहे. ही स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह आनंद नगर सीताबर्डी नागपूर येथे घेण्यात येणार आहे.
तरी इच्छुक कलावंतानी भ्रमणध्वनी- 90211-26343 वर संपर्क साधावा. सविस्तर माहितीसाठी कार्यालय- मूकनायक इंडिया टी.व्ही, प्रथम माळा इम्पेरियल प्लाझा आनंद टॉकीज समोर बर्डी नागपूर येथे संपर्क साधावा असे कवि भास्कर सुमन यांनी कळविले आहे.



